फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.
बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून तिथे 92.50 टक्के, तर मुंबई विभागातून 89.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के
सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के कोकण – 95.89 टक्के
पुणे – 92.50 टक्के
कोल्हापूर – 92.42 टक्के
अमरावती – 92.09 टक्के
नागपूर – 91.65 टक्के
लातूर – 89.79 टक्के
मुंबई –89.35 टक्के
नाशिक – 88.87 टक्के
औरंगाबाद – 88.18 टक्के
कोणत्या शाखेचा निकाल किती टक्के?
विज्ञान – 96.93 टक्के
वाणिज्य – 91.27
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – 86.07
कला – 82.63
निकालाची वैशिष्ट्ये :
परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14,13,687
उत्तीर्ण विद्यार्थी – 12,81,712
उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – 93.88
उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – 88.04
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 93.57 टक्के उत्तीर्ण
पुनर्परीक्षार्थी निकाल – 39.03 टक्के उत्तीर्ण
154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के
बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल.