जगाचा भूगोल : पृथ्वी – संपूर्ण माहिती व महत्वाच्या नोट्स

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.

पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी बरोबर एक दिवसात अथवा २४ तासात एक फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रति दिवशी हा फरक ८६,००० (२४ तासांचे सेकंद)/३६५.२५(एका वर्षातील दिवस) = ३ मिनिटे ५६ सेकंद एवढा असतो.

पृथ्वीचे परिवलन :

 • पृथ्वीची स्वत: भोवती फिरण्याची प्रक्रिया म्हणजे परिवलन होय.
 • पृथ्वी स्वत: च्या आसाभोवती फिरते यालाच परिवलन म्हणतात.
 • अशा परिवलनामुळे दिवस आणि रात्र निर्माण होते.
 • पृथ्वी परिवलनामुळे ध्रुवाकडे चपटी बनते तर विषुववृत्ताकडे फुगीर बनते, कारण परिवलनामुळे पृथ्वीवर केंद्रत्यागी बल (Centrifugal force) निर्माण होते.
 • केंद्रत्यागी बल हे विषुववृत्ताकडे जास्त व ध्रुवाकडे कमी असते.
 • वाऱ्याच्या व सागरी प्रवाहाच्या दिशेने बदल होतो.
 • पृथ्वीला स्वत: भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २३ तास ५६ मि. ४.०९९ सेकंद लागतात.
 • पृथ्वी परिवलन करतांना तीच्या काल्पनिक आसाभोवती फिरते ती आसाभोवती ज्या गतित फिरते त्या गतीला अक्षिय गती असे म्हणतात.
 • पृथ्वीची सुर्याभोवती फिरण्याची प्रक्रिया म्हणजे परिभ्रमण होय.
 • पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे एक वर्ष पूर्ण होते तसेच पृथ्वीवर ऋतूची निर्मीती होते.
 • पृथ्वीला सुर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ आणि १/४ दिवस लागतात.
 • पृथ्वी सुर्याभोवती एका विशिष्ट कक्षेतुन फिरते व कक्षेतून फिरण्याच्या गतीला अक्षीय गती म्हणतात.
 • पृथ्वीच्या सूर्याभोवती लंबवर्तळाकार मार्गाने परिभ्रमण करत असते म्हणून तीचे सुर्यापासूनचे अंतर सारखे नसते.

उपसुर्य स्थिती: जेव्हा पृथ्वी सुर्यापासून कमीत कमी अंतरावर असते या स्थितीत पृथ्वीचा परिभ्रमण कक्षेवरील वेग वाढतो.

उपसुर्य स्थिती: जेव्हा पृथ्वी सुर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. या स्थितीत परिभ्रमण कक्षेबाहेरील वेग कमी होतो.

पृथ्वीवरील स्थान निश्चिती :

पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोहोंचाही उपयोग करावा लागतो.

वेळ निश्चित करणे : GMT (Greenwich Mean Time) ला सुरुवात १९७५ पासुन झाली. पृथ्वीला स्वत: भोवती फिरण्यासाठी २४ तास लागतात म्हणजेच एक वर्तुळाकार (360°) फेरी पूर्ण करण्यासाठी १४४० मिनिटे (24×60 ) लागतात. यावरून पृथ्वीला प्रत्येक अंश पूर्ण करण्यासाठी ४ मिनिटे लागतात. (१५ रेखांश = १ तास)

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ :

एखाद्या ठिकाणाची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा त्याला त्या ठिकाणीची स्थानिक वेळ असे म्हटले जाते.

देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून मानली जाते. तेव्हा त्यास प्रमाण वेळ म्हणतात.

अरुणाचल प्रेदशाच्या अतिपूर्वेकडील भाग व गुजरातचा अती पश्चिमेकडील भाग या प्रदेशांच्या दरम्यान सुमारे २९ रेखांशाचा फरक आहे त्यामुळे या दोन्ही स्थानातील वेळेमध्ये १ तास ५६ मिनिटांचा फरक आहे. भारताची प्रमाण वेळ ही 80° 30′ पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते.

ग्रीनीच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मुळ रेखावृत्त म्हणून मानले आहे. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनच वेळेपेक्षा ५ तास ३० मि. पुढे आहे.

सूर्याची भासमान स्थिती :

दोन्ही स्थितीत सुर्याची स्थिती बदलते. प्रत्यक्षात मात्र पृथ्वी सुर्या भोवती फिरते व सुर्य फिरल्यासारखा जाणवतो म्हणून यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणतात.

पृथ्वीची आयन स्थिती :

ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सुर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो त्या स्थितीस आयन स्थिती असे म्हणतात.

आयन स्थिती ही दोन दिवशी येते आणि त्या दिवसास आयन दीन म्हणतात ते पुढीलप्रमाणे –

२१ जून – उन्हाळ्यातील आयन दिन: या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव जास्तीत जास्त सुर्याकडे कललेला असतो. हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी कर्कवृत्तावर सुर्य किरणे लंबरूप पडतात.

२२ डिसेंबर – हिवाळ्यातील आयन दिन: या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव हा सुर्याकडे कललेला असतो म्हणजे २३ [१/२०] ने कललेला असतो . हा दिवस द.गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी मकरवृत्तावर सुर्यकिरणे लंबरूप पडतात.

संपात स्थिती :

जेव्हा पृथ्वीचे दोन ध्रुव सुर्याकडे असतात त्या स्थितीला संपात स्थिती असे म्हणतात.

 • वसंत संपात : २१ मार्च
 • शरद संपात : २३ सप्टेंबर

या दोन्ही दिवशी सुर्यकिरणे हे विषुवृत्तावर पडतात. या दिवशी पृथ्वीवर दिनमान व रात्रमान हे सर्वत्र सारखे असते (१२-१२ तासाचे)

General FAQ

2 thoughts on “जगाचा भूगोल : पृथ्वी – संपूर्ण माहिती व महत्वाच्या नोट्स”

Leave a Comment