MPSC GK Questions | 07th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk
MPSC GK Questions – 07th July 2020: Read Daily GK For MPSC Exam.

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?

उत्तर : जिनेथ बेदोया लिमा

2) कोणत्या कंपनीने स्मार्टफोनला स्पर्श न करता व्यवहारांचा तपशील बघण्याकरिता मानवी ध्वनीच्या आदेशावर चालणारे अ‍ॅप विकसित केले?

उत्तर : भारतपे

3) कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?

उत्तर : आंध्रप्रदेश

4) कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?

उत्तर : उत्तर कोरिया

5) कोणते राज्य सरकार “निगाह” योजना राबवत आहे?

उत्तर : हिमाचल प्रदेश

6) कोणत्या संस्थेनी ‘सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान’ चालवले आहे?

उत्तर : नीती आयोग

7) कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?

उत्तर : झारखंड

8) 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट

9) कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?

उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

10) कोणत्या राज्य सरकारने ‘आयुष कवच-कोविड’ या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?

उत्तर : उत्तरप्रदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here