MPSC पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी;
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार २१ मार्च रोजी होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.
२७ मार्च आणि ११ एप्रिलची परीक्षा वेळेतच होणार
तसंच याशिवाय इतर परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

MPSC Exams Old Updates | MPSC ची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ”राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या सेवा पुर्व परिक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परिक्षा पुढे ढकलण्यात यावी” असे पत्राद्वारे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून कळविण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडून उपरोक्त निर्णयानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकार नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
