चालू घडामोडी | 09 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 1 ते 4 सप्टेंबर 2020 या कालावधीत भुटानच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेची (UNFAO) आभासी 35 वी ‘आशिया आणि प्रशांत प्रदेशासाठी क्षेत्रीय परिषद’ (APRC 35) पार पडली. परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले.

2) संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) 7 सप्टेंबर 2020 रोजी ओडिशाच्या किनाऱ्यावरील बेटावरून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV) या क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेतली. यासह अमेरिका, चीन आणि रशियानंतर या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातला चौथा देश ठरला.

3) व्हॉट्सअॅप कंपनीने दिल्ली, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर पीस फाउंडेशन या संस्थेसोबत करार केला. हा करार “ई-रक्षा” कार्यक्रमाच्या अंतर्गत केला गेला.

4) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) संस्थेनी तळागाळातील लोकांच्या नवोन्मेषाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी ‘स्कून्यूज’ या शिक्षण माध्यमासोबत करार केला.

5) भारताच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याच्यावतीने 8 सप्टेंबर रोजी पहिली ‘आंतरराष्ट्रीय सौर तंत्रज्ञान शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली.

6) 96.2 टक्के साक्षरतेसह केरळ पुन्हा एकदा देशातील सर्वात साक्षर राज्य म्हणून उदयास आले आहे, तर आंध्र प्रदेश 66.4 टक्के दराने सर्वात खाली आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या सर्वेक्षणानुसार एका अहवालात दिसून आले आहे.

7) ऑस्करविजेत्या झेक चित्रपटाचे दिग्दर्शक जिरी मेंझेल यांचे निधन झाले.

बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव :

  • काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आलेल्या एका उड्डाणपुलाचे मंगळवारी उद्घाटन केले.
  • बंगळूरु महापालिके ने ३४ कोटी रुपये खर्च करून ४०० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे, हा पूल येलहांका येथील मे. संदीप उन्नीकृष्ण मार्गावर आहे.

फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य :

मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.

फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते.

भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ :

ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) अहवालानुसार, 107 विकसनशील देशांमध्ये, 1.3 अब्ज लोक म्हणजेच 22 टक्के लोक बहुआयामी दारिद्रयात जगत आहेत.

बहुआयामी दरिद्री लोकांपैकी निम्मे (644 दशलक्ष) 18 वर्षाखालील बालके आहेत. सहापैकी एक प्रौढ यांच्या तुलनेत तीनपैकी एक बालक दरिद्री आहे. भारताने (2005/2006–2015/2016 या काळात) राष्ट्रीय पातळीवर तसेच बालकांपैकी बहुआयामी दरिद्री लोकांची संख्या (273 दशलक्ष) केली असून ती सर्वात मोठी घट आहे.

तसेच MPI गुण देखील निम्मे केले. ‘2019/2020 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’मध्ये भारताचा 62 वा (गुण: 0.123) क्रमांक आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 09 सप्टेंबर 2020”

  1. I really like this app it gets more knowledge for me. It’s really helpful to study MPSC as well as other competitive exams

    Reply

Leave a Reply