चालू घडामोडी | 09 जून 2020

0

2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI) :

पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातल्या देशांच्या सरकारांकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारांचा आढावा घेणारा ‘2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच 32 निर्देशकांचा वापर करून 180 देशांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आला आहे. हा अहवाल येल आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केला आहे.

भारत 27.6 एवढ्या गुणांसह 168 व्या क्रमांकावर आहे.

ठळक बाबी : डेन्मार्क हा देश या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे लक्झेमबर्ग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनी या देशांच्या प्रथम दहामध्ये समावेश आहे.

तर यादीत तळाशी अफगाणिस्तान, म्यानमार यांच्यानंतर शेवटी लाइबेरिया 180 व्या क्रमांकावर आहे. हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणविषयक इतर धोके यामुळे आरोग्यविषयक खालावलेले परिणाम मिळविणारा भारत क्रमवारीच्या तळाशी आला आहे.

हवेची गुणवत्ता, आधुनिक स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी दीर्घ काळापासून वचनबद्धता दर्शविल्यामुळे डेन्मार्क पर्यावरणविषयक आरोग्याच्या जवळजवळ प्रत्येक निर्देशांकांमध्ये उत्कृष्ट आहे.

मासेमारीचे प्रमाणही कमी झाले असून हा व्यवसाय आज जागतिक अडचणीत आहे. याचा विपरीत प्रभाव बहरीन, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये नोंदवला गेला आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया या सारख्या देशांमध्ये गेल्या पाच वर्षांत अत्याधिक जंगलतोड झाली आहे.

यूएफसी : अमांडाने इतिहास रचला; दोन गटांमध्ये किताब जिंकणारी पहिली फायटर

ब्राझीलच्या अमांडा नुनेसने यूएफसी २५० मध्ये कॅनडाच्या फेलिशिया स्पेन्सरला पराभूत करत इतिहास रचला. ५ मिनिटे रंगलेल्या लढतीत नुनेसला पंचांनी ५०-४४, ५०-४४, ५०-४५ ने विजयी घोषित केले. ती दोन्ही गटांत किताब जिंकणारी पहिली महिला फायटर बनली.

यापूर्वी दाेन्ही गटात अशी कामगिरी कोणीही करू शकले नाही. ‘जेव्हा स्पेन्सरने मला पहिला पंच मारला, तेव्हा मला वाटले की, ती मला कधीच नॉकआऊट करू शकत नाही,’असे विजयानंतर नुनेस म्हणाली. यातील तिची कामगिरी लक्षवेधी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here