चालू घडामोडी | 08 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) निरक्षर असलेल्या लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून ‘युनेस्को’च्या वतीने दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा केला जातो.

2) मोबाइल क्रेच या स्वयंसेवी संस्थेनी प्रकाशित केलेल्या ‘द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया’ अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत केरळ राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ गोवा आणि त्रिपुरा यांचा क्रम लागतो.

3) एका ऐतिहासिक मोहिमेमध्ये भारताने हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV) ची यशस्वी चाचणी केली.

4) 5 सप्टेंबर 2020 रोजी जी-20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांची आभासी बैठक झाली. या बैठकीमध्ये संकटाच्या काळामध्ये आवश्यक असलेले निरंतर शिक्षण, अंगणवाडी शिक्षण आणि शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली.

5) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 50 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या स्टार्टअप उद्योगांना प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गत वित्तसहाय्य दिले जाणार आहे. कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, लघु व्यवसाय / सेवा उद्योग, सूक्ष्म कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, अक्षय ऊर्जा क्षेत्र हे प्राधान्य क्षेत्रामध्ये मोडतात.

6) भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडिअर जनरल अमीर हातमी यांची तेहरान शहरात बैठक झाली. त्यांनी अफगाणिस्तान व द्विपक्षीय सहकार्य तसेच प्रादेशिक सुरक्षा अश्या मुद्द्यांवर चर्चा केली.

7) व्होडाफोन आयडियाने त्याची सर्व उत्पादने नवीन नावाने आणि लोगो “Vi” च्या नावाने बदलून नवीन युनिफाइड ब्रँड आयडेंटिटीची घोषणा केली.

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली.

या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच 6) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.

हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.

या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.

2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते. :

  • करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.
  • 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
  • “2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.
  • चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.
  • सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

Leave a Reply