चालू घडामोडी | 8 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली होती, म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो.

2) रसायनशास्त्रातील संशोधनासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांना देण्यात येणार आहे. जीनोमवरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांनी जीनोमच्या संपादनात महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे.

3) भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि NCERT यांच्यात बधिर मुलांसाठी त्यांच्या पसंतीच्या संवादाच्या, भारतीय संकेत भाषेच्या शैक्षणिक साहित्यामध्ये शिक्षण सामग्री प्रवेश करण्यायोग्य बनविण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करार झाला.

4) आंतरराष्ट्रीय कापूस उद्योग आणि समुदाय आणि जागतिक अर्थव्यवस्थेला दिलेल्या योगदानासाठी डब्ल्यूएचओ मान्यताप्राप्त जागतिक कापुस दिवस (WCD) 2019 पासून 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

5) यंदाच्या वर्षाचे रसायनशास्त्रील नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली. इमॅन्युएल चार्पेंटिअर आणि जेनिफर ए. डॉडना यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. जीनोम एडिटिंगच्या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.

6) मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या महासंचालक पदावर एमए गणपती यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे.

40 दिवसात भारताने चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या:

भारताने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला गती दिली आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर संघर्षाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मागच्या 40 दिवसात भारताने चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. एक क्षेपणास्त्र LAC वर तैनात केले.

सैन्य दलात औपचारिक समावेश करण्याआधीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत. पाच हजार किलोमीटर रेंज असलेल्या K-5, या पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा प्रगती झाली आहे.

वन्यजीव सप्ताह: 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर

देशभरात दरवर्षी ‘वन्यजीव सप्ताह’ 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या आठवड्यात साजरा केला जातो. 2020 हे या सप्ताहाचे 66 वे वर्ष आहे. यंदा या सप्ताहाचे संकल्पसूत्र ‘सस्टेनिंग ऑल लाइफ ऑन अर्थ’ हे आहे.

पार्श्वभूमी : वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती देण्याच्या हेतूने जनजागृती करण्यासाठी 1954 सालापासून दरवर्षी भारत सरकारच्या राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ साजरा करण्यात येतो.

भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जनजागृतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Leave a Comment