चालू घडामोडी | 08 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) चाचा चौधरी या लोकप्रिय कार्टून पात्राची ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी ब्रँड अॅपम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

2) मल्याळम चित्रपट निर्माता असलेले हरिहरन यांना केरळ सरकारच्यावतीने 2019 या वर्षासाठी प्रतिष्ठित ‘जे.सी. डॅनियल पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले आहे.

3) टेरेसा बेटावर अंदमान व निकोबार कमांडच्यावतीने भुदल, नौदल आणि हवाई दलांची ‘बुल स्ट्राइक’ नामक संयुक्त कवायत आयोजित करण्यात आली होती.

4) केरळ पर्यटन विभागाला वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट लंडन संस्थेच्यावतीने ‘मीनिंगफूल कनेक्शन’ श्रेणीत ‘हायली कम्मेन्डेड’ पुरस्कार देण्यात आला. केरळ राज्याच्या ‘जबाबदार पर्यटन’ अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

5) खरगपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत भारतीय ज्ञान प्रणालीसाठी एक उत्कृष्टता केंद्र उभारले जाणार आहे.

6) सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना नेपाळचे अध्यक्ष बिध्या देवी भंडारी यांच्या हस्ते ‘जनरल ऑफ द नेपाल आर्मी’ या मानद सन्मानाने गौरविण्यात आलेले आहे.

7) केंद्राने राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) साठी वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगास सूचित केले आहे.

8) जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.

9) केंद्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या चेन्नईतील चौथ्या बटालियन सेंटरमध्ये केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते 10 बेड्सच्या मेकशिफ्ट कोविड-19 हॉस्पिटल आणि आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन झाले.

10) 1990 च्या दशकात “फरेब” आणि “मेहंदी” सारख्या चित्रपटात काम करणार्याा फराझ खान यांचे बुधवारी बेंगळुरू येथे निधन झाले. ते 46 वर्षांचे होते.

11) अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस निवडून आल्या आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या.

शक्तिकांत दास यांनी SAARC देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या 40 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले :

4 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या SAARC देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची 40 वी बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या गटाला ‘सार्कफायनान्स गव्हर्नर्स ग्रुप’ म्हणून ओळखले जाते.

कार्यक्रमाच्या प्रसंगी दास यांनी ‘सार्कफायनान्स सिंक’ नामक क्लोज्ड यूजर ग्रुप आधारित सुरक्षित संप्रेषण नेटवर्कचे उद्घाटन केले. क्षेत्रातल्या सदस्य देशांच्या दरम्यान जाहीर केलेल्या बृहत्‌-आर्थिक धोरणांबाबतचे अनुभव सामायिक करण्यासाठी ‘सार्कफायनान्स सिंक’ नेटवर्कची स्थापना करण्यात आली.

EOS-01 चे यशस्वी प्रक्षेपण :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Reserarch Organisation) म्हणजेच इस्रोने अंतराळ क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी इस्रोने आपला ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ (Earth Obervation Satellite) EOS-01चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस स्टेंटरवरुन EOS-01 सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

पीएसएलव्ही-सी49 (PSLV-C49)च्या माध्यमातून EOS-01 आणि इतर 9 कमर्शिअल सॅटेलाईटचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. यासोबतच रिसॅट -2 बीआर-2 सह इतर वाणिज्यक सॅटेलाईट्सचं प्रक्षेपण अंतराळात करण्यात आलं. डिसेंबर 2020मध्ये पीएसएलव्ही सी-50 आणि जानेवारी 2021 मध्ये जीसॅट-12आर यांचं सुद्धा अंतराळात प्रक्षेपण केलं जाणार आहे.

EOS-01 ची वैशिष्ट्ये : ईओएस-01 (EOS-01) अर्थ ऑब्झर्व्हेशन रिसेट सॅटेलाईटचं अॅडव्हान्स सीरीज आहे. यामध्ये सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) लावण्यात आले आहे. जे कुठल्याही वेळी आणि कुठल्याही वातावरणात पृथ्वीवर लक्ष ठेवू शकेल. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्याद्वारे ढगांच्या आड असतानाही पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्र टिले जाऊ शकते. याचा फायदा भारतीय लष्करालाही होणार आहे.

Leave a Comment