चालू घडामोडी | 07 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) ओडिशा सरकार राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रुज जहाज चालविणार आहे. धमारा ते परदीप पर्यंतच्या ‘राष्ट्रीय जलमार्ग-5’ यासह चिलिका तलाव, महानदी नदी व दंगमाला वन क्षेत्रात क्रुज जहाज चालवले जाणार.

2) ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीनुसार, व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत आंध्रप्रदेश हे सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य ठरले

3) टाटा मोटर्स कंपनीने भारतातले सर्वात मोठे सौर कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीसोबत करार केला. 6.2 मेगावॅट क्षमतेसह सौर ऊर्जेवर चालणारे कारपोर्ट पुणे शहरातल्या चिखली भागात असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या कारखान्यात तयार केला जाणार आहे.

4) फ्रान्स नंतर जर्मनी हा दुसरा युरोपीय देश ठरला आहे ज्याने ‘हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ स्वीकारले आहे. हिंद-प्रशांत प्रदेशात पर्यायी माल-पुरवठा शृंखला तयार करण्यासाठी अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांनी पुढाकार घेत ‘हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ची रचना केली आहे.

5) संयुक्त राष्ट्र संघ दर वर्षी 05 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्मादाय दिन साजरा करतो.

6) प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या.

‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत आंध्रप्रदेश अग्रस्थानी :

केंद्रीय अर्थ व कंपनी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ अंतर्गत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत विविध धोरणे अंमलात आणण्यात राज्यांनी केल्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले आहे आणि त्यानुसार राज्यांना क्रम देण्यात आला आहे.

  • सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – आंध्रप्रदेश
  • सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी अव्वल दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश – (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि गुजरात.
  • सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा केंद्रशासित प्रदेश – दिल्ली.

दयानंद कॉलेज ऑफ इंटिरियर डिझाईन महाविद्यालयाचा देशपातळीवरील १० नामांकनात समावेश :

आंतरराष्ट्रीय व देशपातळीवर प्रकाशीत होनारे हायर ऐज्युकेशन डायजेस्ट या मैग्झीन पब्लिकेशन संस्थेने देशभरातील इन्टरियर डिझाईन महविध्यालयाचे सर्वेक्षण केले होते.

त्यात महाराष्ट्रातील लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कॉलेज ऑफ इन्टिरीयर डिझाईन या महाविद्यालयास देश पातळीवर प्रथम पहिल्या १० नामांकनामधे समावेश झाला असुन राज्यातील केवळ ३ महाविद्यालयाचा समावेश झाला आहे. यामुळे लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेचा शैक्षणीक पैटर्न आता राज्याबाहेर झळकत आहे.

दरवर्षी देशपातळीवर असलेल्या इंटेरीयर डिझायन महाविद्याालयाचे हायर ऐजुकेशन डायजेस्ट ही संस्था सर्वेक्षण करित असुन या सर्वेक्षनात कॉलेजची गुणवत्ता, कॅम्पस, प्राध्यापक, अभ्यास, लायब्ररी, विविध स्पर्धा, प्रदर्शन, नौकरीसाठी मार्गदर्शन तसेच प्राध्यापक वर्ग, कार्यशाळा, आध्यावत क्रीडांगण याचा समावेश असतो. यात लातूरच्या दयानंद इंटेरीयर डिझायन महाविध्यालय आव्वल ठरले आहे.

पहिल्या १० मधे देशात तर महाराष्ट्रात तिन कॉलेजचा समावेश असुन २ मुंबई येथील महविद्यालय तर मराठवाडा, विदर्भ, पस्चिम महाराष्ट्रात केवळ दयानंद इंटेरीयर महाविध्यालय अव्वल क्रमांकावर आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा सेरेनाने बाजी मारली :

अमेरिकेचीच युवा टेनिसपटू स्लोआन स्टीफन्सचा अडथळा सेरेना व्हिल्यम्सने ओलांडला. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सेरेनाने स्टीफन्सला 2-6, 6-2, 6-2असे पराभूत केले.

विक्रमी 23 ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने पहिला सेट गमावूनही बाजी मारली. सेरेनाने स्टीफन्सविरुद्धच्या 12 लढतींतील 10 लढतींत आता विजयाची नोंद केली आहे.

Leave a Reply