चालू घडामोडी | 07 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) आंध्रप्रदेश राज्य ऊर्जा संवर्धन अभियानाच्या समन्वयाने ब्यूरो ऑफ एनर्जी एफीश्यंसी (BEE) संस्थेच्यावतीने “गो इलेक्ट्रिक” मोहीम राबवली जात आहे. मोहिमेच्या अंतर्गत विजेरी वाहनांसाठी राज्यभरात 400 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार.

2) बांगलादेश सरकार, बेक्सिमको फार्मास्युटिकल लिमिटेड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) यांच्यात गुरुवारी तीन कोटी COVID 19 लस देण्यासाठी एक सामंजस्य करार झाला.

3) सार्क फायनान्स गव्हर्नर्स ’गटाची 40वी बैठक रिझर्व्ह बँक ऑफ गव्हर्नर श्री शक्तीकांतदास दास यांच्या अध्यक्षतेखाली आभासी झाली.

4) व्हॉट्सअ‍ॅपने ‘इफेमरल मेसेजिंग’ हे वैशिष्ट्य स्वीकारले आहे, ज्यामुळे मंचावर होणारे संभाषण काही वेळाने स्वयंचलितरित्या मिटते.

5) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर भारतातल्या सर्व वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप इंकने आपले पेमेंट फीचर- युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सुरू केले आहे.

6) टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (TRP) यंत्रणा पाहण्याकरिता आणि अधिक मजबूत व पारदर्शक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या चार सदस्यीय समितीची घोषणा केंद्राने केली.

7) गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने ‘डेटा मॅच्युरिटी अॅसेसमेंट फ्रेमवर्क – सायकल 2’ कार्यक्रमाचा प्रारंभ केला, जो शहरांमधील डेटा परिसंस्थेचे मूल्यांकन करण्यासाठीचा कार्यक्रम आहे.

8) संयुक्त राज्ये अमेरिका देशाने हवामानातल्या बदलांच्या विषयक 2015 सालाच्या पॅरिस करारातून औपचारिकपणे माघार घेतली.

9) मध्य अमेरिकेच्या निकाराग्वा देशात ‘एटा’ चक्रीवादळ धडकले. ते श्रेणी 4 चे चक्रीवादळ होते. निकाराग्वा प्रशांत महासागर आणि कॅरिबियन समुद्र यांच्या मध्यात आहे.

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार :

महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.

सोलापूरमध्ये होणार पुरस्कार वितरण – यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

ज्ञानेंद्रो निंगोम्बाम हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष :

मणिपूरचे ज्ञानेंद्रो निंगोम्बाम हाॅकी इंडियाचे (एचआय) बिनविरोध नवे अध्यक्ष बनले. त्यांनी मोहंमद मुश्ताक अहमदची जागी घेतली. मुश्ताक यांना वरिष्ठ उपाध्यक्ष बनवले. निंगोम्बाम नॉर्थ ईस्टचे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना ही जबाबदारी मिळाली.

ते दोन वर्षे या पदावर राहतील. २००९ ते २०१४ दरम्यान ते मणिपूर हॉकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हाेते. मुश्ताक अहमदने पद सोडल्यानंतर त्यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते.

Leave a Comment