चालू घडामोडी | 07 जून 2020

0

EESL आणि USAID यांचा “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ऊर्जा कार्यक्षम सेवा मर्यादित (EESL) या सार्वजनिक कंपनीने अमेरिका देशाच्या USAID या संस्थेच्या MAITREE कार्यक्रमासोबत भागीदारीने “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” (Healthy and Energy Efficient Buildings) नावाचा एक नवा उपक्रम सुरु केला आहे.

हा कार्यस्थळ अधिक निरोगी आणि पर्यावरण पूरक बनविण्याच्या दिशेने पुढाकार घेणारा उपक्रम आहे.

ठळक बाबी : ऊर्जा कार्यक्षमतेसाठी बाजाराचे एकत्रीकरण आणि परिवर्तन कार्यक्रम (MAITREE) अंतर्गत चालणारा हा उपक्रम ऊर्जा-मंत्रालय आणि USAID मधील अमेरिका-भारत द्विपक्षीय भागीदारीचा एक भाग आहे.

इमारतींमध्ये मानक सराव म्हणून प्रभावी ऊर्जा कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करण्याला गती देणे आणि विशेषतः इमारतींमधील वातावरण थंड होण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

“निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रमाचा एक पथदर्शी उपक्रम म्हणून EESL कंपनीने स्वतःच्या इमारतीमध्ये ही रचना अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

EESL कार्यालयातल्या या पथदर्शी उपक्रमामुळे संपूर्ण देशभरातल्या इतर इमारतींमध्ये वापरासाठी वैशिष्ट्ये विकसित करणे त्याचबरोबर, विविध तंत्रज्ञानाचा प्रभावीपणा व खर्च-फायद्यांचे मुल्यांकन करण्यात मदत करणे आणि हवेची गुणवत्ता, आराम आणि ऊर्जा वापराचा अल्प आणि दीर्घकालीन परिणामांचे मुल्यांकन करणे या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.

तीन नव्या कोळसा खाणींचे उद्‌घाटन :

कोल इंडियाची उपशाखा वेस्टर्न कोलफिल्ड्‌स लिमिटेडने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आपल्या तीन नव्या खाणी आज सुरू केल्या. या तिन्ही खाणींची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता, 2.9 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. या तिन्ही खाणींमध्ये कंपनी, एकूण 849 कोटी रुपयांचे भांडवल गुंतविणार असून या खाणींमधून 647 जणांना थेट रोजगार मिळणार आहे.

वेस्टर्न कोलफिल्ड्‌चे, आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत, 75 मेट्रिक टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे. या खाणी सुरु केल्यास उद्दिष्टाचा मैलाचा दगड गाठण्यात निश्‍चितच मदत होईल आणि कोल इंडिया ला वित्तीय वर्ष 2023-24 पर्यंत 1 अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. असे प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले.

उद्‌घाटन तीन खाणींपैकी, आदासा ही महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात आहे. सारडा ही कन्हान भागात आणि धनकसा ही मध्यप्रदेशातील पेंच भागात आहे. आदासा खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता, 1.5 मेट्रिक टन इतकी आहे आणि सारडा तसेच धनकासा खाणींची वार्षिक क्षमता अनुक्रमे 0.4 आणि 1 मेट्रिक टन इतकी आहे.

महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासंदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ :

जैव साखळी आणि शाश्वतता मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. रस्त्यावरचे मृत्यू रोखण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या आणि शिक्षणाच्या गरज लक्षात घेता, दिनांक 5 जून 2020 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखणे” याच्या संदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

ठळक बाबी : संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे. भारतात वर्षाला सुमारे पाच लक्ष रस्ते अपघात होतात. त्यामध्ये 1.5 लक्ष मृत्यू होतात. येत्या 31 मार्चपर्यंत हे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

सुमारे पाच हजार अपघातप्रवण ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अपघातप्रवण भागांसाठी अल्प आणि दीर्घ कालीन कायमस्वरूपी उपाययोजनासाठी मानक संचालन पद्धती आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत नव्याने निश्चित केलेल्या 1739 अपघातप्रवण ठिकाणी तात्पुरत्या तर नव्याने निश्चित केलेल्या अशा 840 ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्रांसाठी रस्ते सुरक्षा उपाय अधोरेखित करण्यात आले असून, मोडकळीला आलेल्या आणि अरुंद पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती, रस्ते सुरक्षा तपासणी, असुरक्षित रस्त्यावरचे अपघाती मृत्यू कमी करणे, महामार्ग गस्त आणि बांधकामा दरम्यानची सुरक्षा यांचा यात समावेश आहे.

रस्ते बांधकाम तसेच विद्युत, दूरसंवाद यासह इतर पायाभूत वाहिन्यांसाठी काम करताना वन्यजीवांची हानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी देहरादून इथल्या भारतीय वन्यजीव संस्थेने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण स्नेही उपायांचा अवलंब करण्याच्या सूचना सर्व संस्थांना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here