चालू घडामोडी | 07 जुलै 2020

डिजिटल सुरक्षेच्या संदर्भात शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालविण्यासाठी CBSE आणि फेसबुक यांच्यात करार :

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि फेसबुक कंपनी यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाइन कल्याण’ आणि ‘संवर्धित वास्तविकता’ या विषयांवर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे.

ठळक बाबी

  • हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन आठवड्यांसाठी घेण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकी दहा हजार शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहतील.
  • कार्यक्रमाचा पहिला टप्पा ऑगस्ट 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत आभासी स्वरूपात चालणार आहे.
  • कार्यक्रमाच्या द्वितीय टप्प्यात विविध गटांमधल्या तीस हजार विद्यार्थ्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

इस्रायलचा नवा हेरगिरी उपग्रह :

इस्रायलने सोमवारी नवा हेरगिरी उपग्रह सोडला. त्यामुळे त्या देशाच्या लष्करी हेरगिरी करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. विशेषत: इराणसारख्या प्रबळ शत्रूकडील आण्विक ताकद ही इस्रायलची डोकेदुखी आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी इस्रायल आपल्या टेहळणी क्षमतेत वाढ करत आहे. ओफेक 16 हा उपग्रह सोमवारी पहाटे अवकाशात सोडण्यात आला.

त्यासाठी इस्रायली बनावटीचे शाविट रॉकेटचा वापर करण्यात आला. आधुनिक क्षमतेचे इलेक्ट्रो ऑप्टीकल रेकन्सिअन्स सॅटेलाईट असे या उपग्रहाचे वर्णन संरक्षण मंत्रालयाने केले आहे. या उपग्रहाकडून एक आठवड्यात प्रतिमा मिळण्यास सुरवात होईल.

सरकारी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने हा उपग्रह बनवला आहे. त्यातील तांत्रिक बाजू संरक्षण संस्था एल्बीट सिस्टिमने सांभाळली आहे.

‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG) 2020’ याच्या यादीत भारत 117 व्या क्रमांकावर :

संयुक्त राष्ट्रसंघांकडून ‘शाश्वत विकास अहवाल 2020’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात 2020 सालाचा अद्ययावत ‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG)’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘शाश्वत विकास निर्देशांक 2020’ मधील 166 देशांच्या या यादीत भारताचा 117 वा क्रमांक लागतो आहे. इतर

ठळक बाबी

  • ‘शाश्वत विकास निर्देशांक 2020’ मधील यादीत स्वीडन हा देश प्रथम क्रमांकावर आहे.
  • यादीत प्रथम दहामध्ये स्वीडन देशाच्या पाठोपाठ डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, नेदरलँड आणि एस्टोनिया या देशांचा क्रम लागतो आहे.
  • भारताचे शेजारी देश, बांग्लादेश आणि पाकिस्तान ही अनुक्रमे 109 आणि 134 व्या क्रमांकावर आहेत. भारताने दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता, सभ्य काम आणि आर्थिक वाढ तसेच हवामानविषयक कार्य अश्या क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती केली आहे.
  • SDG 13 म्हणजेच हवामानविषयक कार्य या क्षेत्रांमध्ये भारताने आपले ठरविलेले ध्येय साध्य केले आहे.

Leave a Comment