चालू घडामोडी | 7 एप्रिल 2021

0

MPSC Current Affairs | 7 April 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


वन लायनर

 • दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो. 2021 साठी संकल्पना – “बिल्डिंग ए फेअरए, हेंल्थीयर वर्ल्ड”.
 • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ एप्रिल अखेरीस संपत असून, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमण यांची भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, २४ एप्रिल रोजी ते पदाची शपथ घेणार आहेत.
 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE संलग्न शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्याकरिता प्रशिक्षण देण्याकरिता _____ सोबत सामंजस्य करार केला – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE).
 • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे प्रगत चॅफ / शाफ (Chaff Technology) तंत्रज्ञान विकसित केले आहे.
 • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी “दुर्मिळ आजारविषयक राष्ट्रीय धोरण 2021” याला मान्यता दिली, ज्याचा दुर्मिळ आजारांवरील उपचारांचा खर्च कमी करणे आणि एक निमंत्रक म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील आरोग्य संशोधन विभाग याच्या सोबत स्थापन करण्यात येणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेच्या मदतीने स्वदेशी संशोधनावर भर देणे हा प्रमुख उद्देश आहे.
 • जम्मू व काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या 111 किलोमीटर लांबीच्या रेलमार्गादरम्यान जगातला सर्वात उंच रेल्वे पूल ‘चिनाब’ नदीवर बांधण्यात येत आहे. त्याला ‘आर्च ऑफ चिनाब ब्रिज’ असे नाव देण्यात आले आहे.
 • सिक्कीम सरकार शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक सूक्ष्म-शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले.
 • डॉ चिंतन वैष्णव हे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक आहेत.
 • भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद येथील संशोधकांनी ड्युएल कार्बन बॅटरी विकसित केली आहे जी विद्यमान लिथियम-आयन बॅटरीला पर्याय ठरू शकते.
 • नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) याचे नवीन महासंचालक आणि प्रथम महिला महासंचालक – पूनम गुप्ता.
 • भारतीय क्रिकेटमधील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे वयाच्या 88व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here