वन लायनर चालू घडामोडी
1) 2 सप्टेंबर 2020 रोजी श्रीलंका देशाने BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले.
2) महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या MSME परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक प्रकल्प व्यवस्थापन एकेक (PMU) स्थापन करण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) सोबत करार केला आहे.
3) भारतीय ग्रँडमास्टर पी. इनियान याने ‘वर्ल्ड ओपन ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धा 2020’ जिंकली. तामिळनाडूचा पी. इनियान हा भारताचा 61 वा ग्रँडमास्टर आहे.
4) कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या 5 व्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
5) भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या रशिया दौर्यामध्ये, मॉस्को येथे झालेल्या बैठकीत रशियाने पाकिस्तान देशाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा न करण्यासंबंधी धोरणाची घोषणा केली.
6) भारतीय आणि रशियन नौदल यांच्यात द्विवार्षिक द्विपक्षीय सागरी व्यायाम बंगालच्या उपसागरात सुरू होत आहे.
7) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ (SGNP) आरे दूध कॉलनीत 600 एकर जागा पार्सल वन म्हणून आरक्षित केले जाईल.
8) हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारतीय उद्योग परिसंघ (CII) – गोदरेज ग्रीन बिझिनेस सेंटर (GBC) ‘नॅशनल एनर्जी लीडर’ आणि ‘एक्सेलेंट एनर्जी एफिशिएंट युनिट’ हा पुरस्कार जिंकला आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान :
अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले.
देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 47 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणीमध्ये गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
‘BIMSTEC सनद’ला अंतिम स्वरूप प्राप्त झाले :
BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) यांच्या स्थापनेनंतर 23 वर्षांनंतर ‘BIMSTEC सनद’ याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.
2 सप्टेंबर 2020 रोजी श्रीलंका देशाच्या अध्यक्षतेखाली BIMSTEC गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी घोषणा करण्यात आली. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंग यांनी केले.