चालू घडामोडी | 6 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) चीनबरोबर सुरू असलेल्या सीमाप्रश्नादरम्यान झालेल्या मोठ्या यशात, भारताने ओडिशाच्या किना-यावर अणू-सक्षम शौर्य क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. हे सुमारे 800 कि.मी. अंतरावर लक्ष्य ठेवू शकते.

2) भारत आणि फ्रान्स हिंद महासागरावर सागरी पाळत ठेवण्यासाठी उपग्रहांचे एक जाळे तयार करणार आहे. जहाजांद्वारे होणाऱ्या तेलगळतीचा शोध घेण्यासाठी यांचा वापर केला जाणार. हे जाळे भारताची ISRO आणि फ्रान्सची CNES संस्था उभारणार आहे.

3) फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार सोफिया वरगारा ही जगातील सर्वाधिक मानधन घेणारी महिला अभिनेत्री आहे.

4) जैवविविधतेत वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती व्हावी, त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, यासाठी 1954 सालापासून दरवर्षी भारत सरकारच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ’तर्फे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर हा आठवडा ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो.

5) भारतीय विकसकांना त्यांची उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी पेटीएम या खासगी डिजिटल पेमेंट कंपनीने त्याचे मिनी-अॅप स्टोअर उघडले.

6) हिमाचल प्रदेश राज्यातल्या हमीरपूर तालुक्यातल्या आमली गावाजवळ बियास (river Beas) नदीवर 66 MW निर्मिती क्षमतेचा ‘धौलसिध जलविद्युत प्रकल्प’ बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प SJVN मर्यादित कंपनी बांधणार आहे.

7) केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी ग्रामीण विकासासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन तंत्रज्ञान परिषद सुरू केली.

8)भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) 1988 च्या तुकडीचे असलेले अपूर्व चंद्र यांनी महाराष्ट्र केडर यांनी कामगार व रोजगार मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

‘स्मार्ट’ (सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडो) याची चाचणी यशस्वी :

‘स्मार्ट / SMART’ (सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडो) याची 5 ऑक्टोबर 2020 रोजी ओडिशा किनारपट्टीलगतच्या व्हीलर बेटावरून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. क्षेपणास्त्रातून टॉरपेडो (जलतीर) सोडणे तसेच त्याचा वेग कमी करण्याचे तंत्रज्ञान (VRM) या सर्व चाचण्यांची निश्चित केलेली उद्दिष्टे या क्षेपणास्त्राने यशस्वी केली आहेत.

‘स्मार्ट’ सामान्यपणे टॉरपीडोच्या मारा क्षमतेच्या पलीकडचे लक्ष्य (पाणबुडी) भेदण्यासाठी क्षेपणास्त्राद्वारे सोडली जाणारी वजनाने हलकी पाणबुडी-रोधी टॉरपेडो प्रणाली आहे. टॉरपीडो जवळपास 650 किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकते.

हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधाबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर:

यकृताचा कर्करोग आणि यकृताची सूज या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ हार्वे जे. ऑल्टर, चार्ल्स एम. राइस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.

ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या कार्यामुळे रक्तातील ‘हेपॅटायटिस सी’ या रोगाचे मुख्य कारण स्पष्ट होण्यास मदत झाली. त्याचबरोबर चाचण्या आणि औषधे विकसित करून लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले, अशा शब्दांत नोबेल समितीने शास्त्रज्ञांचा गौरव केला.

वैद्यकशास्त्रातील या ऐतिहासिक शोधाबद्दल नोबेल समितीने तिन्ही शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या शोधामुळे ‘हेपॅटायटिस सी’ विषाणूविरोधी औषधांची निर्मिती वेगाने करता आली. हा रोग आता बरा करता येतो आणि जगातून या विषाणूचे समूळ उच्चाटन होऊ शकते,’’ अशी आशा नोबेल समितीने व्यक्त केली.

Leave a Comment