चालू घडामोडी | 06 जून 2020

फुटबॉल : भारताला मिळाले २०२२ महिला आशिया कपचे यजमानपद

एशियन फुटबॉल फेडरेशनने (एएफसी) २०२२ महिला आशिया कपचे यजमानपद भारताला दिले. १९७९ पासून सुरू असलेल्या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदा देशात होईल. फेब्रुवारीमध्ये एएफसी महिला फुटबॉल समितीने भारताला यजमानपद स्वीकारण्याची विनंती केली होती.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला लिहिलेल्या पत्रात एएफसीचे महासचिव दाटो विंडसर जॉन यांनी म्हटले की, ‘समितीने महिला आशिया कप २०२२ फायनल्सच्या आयोजनाची जबाबदारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनवर सोपवली आहे.’ एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेलने म्हटले की, या स्पर्धेमुळे महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील.

“ट्युलिप”: शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्या पदवीधरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि गृहनिर्माण तसेच शहरी कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत दिनांक 4 जून 2020 रोजी संयुक्तपणे “ट्युलिप (द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम – TULIP)” (म्हणजेच नागरी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम)या नावाने एक नवा उपक्रम आरंभ करण्यात आला आहे.

अशा प्रकारचा उपक्रम देशात प्रथमच सुरु होत असून, “ट्युलिप” कार्यक्रमाद्वारे देशभरातल्या सर्व शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्याने पदवीधर झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठीच्या विशेष संकेतस्थळाचे देखील या प्रसंगी उद्घाटन करण्यात आले.

ठळक बाबी : राष्ट्रउभारणीच्या कामात देशातील युवकांमध्ये असलेली क्षमता वापरण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ट्युलिप उपक्रमामुळे देशातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवता येणार आणि विद्यार्थ्यांकडील नव्या कल्पनांचा तसेच अभिनव विचारांचा नव्या भारताच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेता येणार.

ट्युलिप उपक्रम देशभरातल्या 4400 शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांच्या यंत्रणेत उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी मिळवून देणार आहे. तसेच या मंचाद्वारे तरुणांना शहरी स्थानिक संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव पद्धतींच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या कल्पना राबवता येणार.

ट्युलिप उपक्रमाद्वारे पहिल्याच वर्षी 25000 नव्या पदवीधरांना इंटर्नशिप करता येणार अशी अपेक्षा आहे. त्यातून विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उत्तम स्त्रोत निर्माण होणार.

मनुष्यबळ विकास विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने 2025 सालापर्यंत 1 कोटी उमेदवारांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्याच्या दिशेने ट्युलिप उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे पाउल आहे.

एसटीच्या कर्मचारी व औद्योगिक उपमहाव्यवस्थापकपदी शैलेश चव्हाण यांची नियुक्ती :

एसटीच्या कर्मचारी व औद्योगिक महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या पदाची परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुदतवाढ नाकारली असून, एसटीतील उपमहाव्यवस्थापकपदी शैलेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, महाव्यवस्थापक सध्या पद रिक्त ठेवण्यात आले आहे. तर तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात माधव काळे 2016 मध्ये कर्मचारी व औद्योगिक संस्था पदासाठी एसटीमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आली होती.

किरण मजूमदारांना आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर २०२० पुरस्कार :

बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजूमदार यांना ईवाय वर्ल्ड आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर २०२० ने सन्मानित केले आहे. आभासी समारंभात त्यांना हा किताब दिला. किरण यांची ४१ देशांच्या ४६ पुरस्कार विजेत्यांतून निवड केली आहे.

त्या भारताच्या तिसऱ्या ईवाय वर्ल्ड आंत्रप्रेन्योर झाल्या. त्यांच्याआधी कोटक महिंद्रा बँके(२०१४)चे उदय कोटक व इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड(२००५)चे नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply