चालू घडामोडी | 06 जुलै 2020

0

तृतीयपंथींना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आधिकारी होण्याची संधी:

तृतीयपंथींना आता केंद्रीय सशस्तर पोलीस दलात आधिकारी होण्याची संधी मिळाणार आहे. सीआरपीएफ, आईटीबीपी, एसएसबी आणि बीएसएफ या दलांनी तृतीयपंथींना कॉम्बैट ऑफिसर पदांवर भरती करण्यासाठी गृह मंत्रालयाला हिरवा कंदील दाखवला आहे.

पण देशातील 60 पेक्षा जास्त विमानतळावर सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआईएसएफने यासाठी सरकारकडे आणखी वेळ मागितला आहे.

जगातील सर्वात मोठे १० हजार खाटांचे कोविड सेंटर दिल्लीत :

दिल्लीतील छतरपूर भागात १००० बेडच्या सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले. याची उभारणी भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) केली आहे.

यातील वॉर्डांना गलवानमधील शहीद जवानांची नावे दिली अाहेत. कोरोनाचे हे जगातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांवर उपचार केले जातील. येथे व्हेंटिलेटरऐवजी ऑक्सिजनची सुविधा आहे.

ती १,००० बेडसाठी उपलब्ध होऊ शकते. येथे लक्षणे असलेले, परंतु घरी क्वॉरंटाइनची सुविधा नसलेल्या रुग्णांवरही उपचार केले जातील. या सेंटरची जबाबदारी आयटीबीपी आणि सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवर आहे.

आकाश भारताचा ६६ वा ग्रँडमास्टर :

तमिळनाडूचा जी. आकाश भारताचा ६६वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून (फिडे) ग्रँडमास्टर म्हणून आकाशच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. चेन्नईच्या आकाशचे ‘फिडे’ क्रमवारीत २४९५ रेटिंग आहे.

‘‘भारताच्या ग्रँडमास्टरच्या यादीत मला स्थान मिळाले याचा अभिमान आहे. यापुढेही मेहनत घेणार असून लवकरच २६०० रेटिंग करायचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करायचे असल्याने बुद्धिबळ काही महिने खेळत नव्हतो.

जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचं महत्व अधिक अधोरेखित होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलं.

या मैदानात १ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही ८० हजार एवढी आहे. यानंतर जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनने याबद्दलची घोषणा केली असून, या मैदानाची क्षमता ७५ हजार एवढी असणार आहे. या मैदानासाठी जयपूर जवळील चौम्प गावाजवळ जमीन निश्चीत करण्यात आलेली असून, सुमारे १०० एकर जमिनीवर हे मैदान उभारलं जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2021: ‘प्रेरक दौर सन्मान’ ही पारितोषिकाची नवी श्रेणी घोषित :

गृह व शहर नियोजन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गृह व शहर नियोजन विभागातर्फे भारताच्या शहरी भागासाठी वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण केले जाते, त्याचा हा सहावा भाग आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘प्रेरक दौर सन्मान’ असे नामाभिधान असलेल्या पुरस्कारांची नवी श्रेणी यावेळी घोषित करण्यात आली.

‘प्रेरक दौर सन्मान’ या पुरस्काराचे एकूण पाच उपप्रकार असणार आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत – दिव्य (प्लॅटिनम), अनुपम (सुवर्ण), उज्ज्वल (रौप्य), उदित (ब्रॉंझ), आरोही (उत्तेजनार्थ). प्रत्येक श्रेणीत तीन शहरांना गौरविले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here