चालू घडामोडी | 6 एप्रिल 2021

0

MPSC Current Affairs | 6 April 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


वन लायनर

  • महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री – दिलीप वळसे पाटील.
  • साउथ इंडियन बँक या खासगी बँकेला संपूर्ण मालकीची बिगर-वित्तीय सहाय्यक संस्थेची स्थापना करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाली.
  • कोसोव्हो देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष – वजोसा उस्मानी (महिला प्राध्यापक).
  • व्हिएतनाम देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष – गुएन झुआन फुक.
  • 5 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी आभासी 10 व्या D-7 शिखर परिषदेचे आयोजन करणारा देश – बांगलादेश.
  • ‘दुबई पॅरा बॅडमिंटन स्पर्धा 2021’ मधील SL4 प्रकारात पुरुष एकेरी गटाचे सुवर्णपदक जिंकणारा – प्रमोद भगत.
  • ‘2021 स्पोर्टस्टार एसेस’ याचा ‘स्पोर्ट्स ऑफ द डिकेड’ पुरस्काराचे विजेते – एम. सी. मेरी कोम.
  • भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवीन प्रमुख – शबीर हुसेन शेखदम खंडावाला (अजित सिंग यांच्या जागी).

एन.व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ एप्रिल अखेरीस संपत असून, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रमण यांची भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, २४ एप्रिल रोजी ते पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी पूर्ण होत आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान भारतात विकसित :

संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ / शाफ (Chaff) तंत्रज्ञान विकसित केले आहे.

DRDOच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळेने (DLJ) या महत्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. भारतीय लष्कराच्या गुणात्मक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लघु पल्ला चॅफ रॉकेट (SRCR), मध्यम पल्ला चॅफ रॉकेट (LRCR), दीर्घ पल्ला चॅफ रॉकेट (LRCR) विकसित करण्यात आले आहे.

शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते.

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर या तीनही प्रकारांच्या नुकत्याच चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात विकसित करून मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मोकळे करण्यात आले आहे.

पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा :

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (६८) यांनी सोमवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रशियात गेल्या वर्षी झालेल्या मतदानानुसार रशियामध्ये घटनादुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यानुसार पुतिन यांना आणखी दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येणार आहे. पुतिन गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर आहेत. सध्याची अध्यक्षपदाची मुदत २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी व्हावयाचे की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

नियमित कामकाजावर लक्ष ठेवण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांना आपला वारसदार कोण, याकडे लक्ष देण्यापासून दूर ठेवण्यासाठी अध्यक्षपदाच्या मुदतीचा कालावधी वाढविणे गरजेचे होते, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी स्वाक्षरी केलेला कायदा सोमवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here