चालू घडामोडी | 05 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

2) चीन देशाकडे जगातले सर्वात मोठे नौदल असल्याची अमेरिकेकडून घोषणा करण्यात आली. चीनच्या नौदलात 350 युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश आहे.

3) रेल्वे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व्ही.के. यादव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. यासह ते रेल्वे मंडळाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले.

4) ‘बॅंकिंग अधिनियम-1949’च्या अन्वये, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेच्या कामकाजावर भारतीय रिझर्व्ह बँकेनी प्रतिबंध आणले आहेत.

5) मुरली रामकृष्णन यांची केरळस्थित साऊथ इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 1 ऑक्टोबर 2020 पासून पदावरती वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

6) भारत देश 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटना (SCO) समूहाच्या सदस्य सरकारांच्या प्रमुखांच्या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.

7) दोन भारतीयांना जागतिक दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्याविषयीचा प्रस्ताव पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेपुढे (UNSC) मांडला होता. परंतु पुराव्यांच्या अभावाखाली UNSCने प्रस्ताव नामंजूर केला आहे.

8) एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रेकॉर्डमध्ये 23.9% घट झाली आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालानुसार- ईकोराप – वित्तीय वर्ष 2021 मधील वास्तविक जीडीपी 10.9% ने कमी होणे अपेक्षित आहे.

“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव

भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.

“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.

ब्रुकफिल्डच्या २५ हजार कोटींच्या व्यवहारास सरकारची मंजुरी :

रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.

पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील १.३५ लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.

मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.

Leave a Comment