चालू घडामोडी | 5 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे.

1) पश्चिम बंगाल सरकारने 7000 हून अधिक रस्ते दुरुस्त करण्यासाठी ‘पथश्री अभियान’ला आरंभ केला. या योजनेच्या अंतर्गत एकूण 12 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

2) केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ भारत पुरस्कार-2020’ यांचे वाटप करण्यात आले. स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीत – गुजरात (राज्य), तिरुनेलवेली, तमिळनाडू (जिल्हा). सामुदायिक शौचालय अभियान श्रेणीत – गुजरात आणि उत्तरप्रदेश (राज्य), प्रयागराज आणि बरेली (जिल्हा). गंदगी मुक्त भारत मिशन श्रेणीत – हरियाणा आणि तेलंगणा.

3) नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ने ग्रामीण भागातील शाश्वत व निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी जल व स्वच्छता (डब्ल्यूएएसएएच) कार्यक्रमासाठी एक विशेष पुनर्वित्त सुविधा जाहीर केली आहे. याअंतर्गत नाबार्डने सन २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

4) अमेरिकेकडून C-130J सुपर हर्क्यूलिस विमान खरेदी करण्यासाठी भारताने 90 दशलक्ष डॉलर एवढ्या किंमतीचा संरक्षण करार केला.

5) पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे 15 जून रोजी भारत-चीन हिंसक चकमकीत प्राण गमावलेल्या 20 भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याने स्मारक तयार केले.

6) परिधान निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (AEPC) परिधान प्रशिक्षण व संरचना केंद्र (ATDC) यांनी जागतिक बँकेच्या ‘स्किल्स स्ट्रेन्थनिंग फॉर इंडस्ट्रियल वॅल्यू एनहांसमेंट’ (STRIVE) प्रकल्प चालविण्यासाठी तामिळनाडू राज्यातल्या 77 वस्त्रोद्योगांसोबत करार केला.

7) उत्तराखंड राज्य सरकारने महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ‘हॅव प्युअर नॅच्युरली युवर्स’ नामक उपक्रमाचा आरंभ केला.

अभिनेता सोनू सूदला ग्रामोदय बंधु मित्र पुरस्कार :

ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीने (जीसीओटी) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) गरीब आणि कमगारांच्या मदतीला पुढे धावून आल्यामुळे बंधु मित्र पुरस्कारने (Gramodaya Bandhu Mitra award )सन्मानित करण्यात आलं आहे.

जीसीओटीच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोनू सूदचा गौरव करण्यात आला.

“बोंगोसागर”: भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांची संयुक्त सागरी कवायत

भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांनी “बोंगोसागर” नामक संयुक्त सागरी कवायत आयोजित केली. 3 ऑक्टोबर 2020 पासून तीन दिवस हा युद्धसराव चालणार आहे. यंदा या कवायतीचे हे दुसरे वर्ष आहे.

ठळक बाबी

  • दोन्ही देशांच्या नौदलांची ही संयुक्त कवायत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली.
  • दरम्यान दोन्ही देश संयुक्तपणे गस्त घालून परस्परांच्या सागरी सीमेचे रक्षण करणे तसेच गस्त घालताना सतत एकमेकांशी समन्वय ठेवणे या मोहिमा पार पाडणार.
  • भारताकडून कवायतीसाठी INS किल्टन ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि INS खुकरी ही अचूक क्षेपणास्त्र हल्ले करणारी युद्धनौका सहभागी झाली.
  • भारताच्या ‘सागर’ (Security And Growth for All in the Region – SAGAR) नामक दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देशांसोबत समन्वय राखण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी ‘बोंगोसागर’ कवायत केली जात.

Leave a Comment