चालू घडामोडी | 05 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक त्सुनामी जागृती दिन 5 नोव्हेंबर रोजी जगभरात पाळला जातो.

2) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने विकसित केलेले एन्हांस्ड पिनका रॉकेटचे ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर एकात्मिक चाचणी रेंजमधून यशस्वीरीत्या उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.

3) छत्तीसगड सरकारने प्रायोगिक तत्वावर कोंडागाव जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून पोषक तांदूळचे वाटप करण्याच्या योजनेचा प्रारंभ केला. या सुधारित तांदूळमध्ये व्हिटॅमिन बी-12, लोह आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण अधिक असून ते आहारातल्या पौष्टिक गरजा पूर्ण करतात, ज्यामुळे कुपोषण दूर केले जाऊ शकते.

4) AIIMSचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोविड-19 याच्यासंबंधीत “टिल वी विन’ हे पुस्तक लिहिले.

5) नवी दिल्लीच्या नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) संस्थेनी “एस्टीमेटिंग द इकनॉमिक बेनिफिट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन मॉन्सून मिशन अँड हाय-परफॉरमन्स कॉम्प्यूटिंग (HPC) फॅसिलिटीज” अहवाल तयार केला आहे.

6) केरळ सरकार नाबार्डच्या सहकार्याने स्वत: दुधाची पावडर कारखाना उभारणार आहे.

7) ‘मलबार’ सागरी कवायतीच्या 24 व्या आवृत्तीचे आयोजन नोव्हेंबर 2020 महिन्यात दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. पहिला टप्प्याचे आयोजन दि. 3 ते 6 नोव्हेंबर 2020 मध्ये होणार आहे. ‘मलबार 20’ याच्या पहिल्या टप्प्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलांची पथके सहभागी होणार आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियाने प्रथमच या कार्यक्रमात भाग घेतला आहे.

8) पोर्तुगालचे डुआर्ट पाचेको यांची वर्ष 2020 ते वर्ष 2023 या कालावधीसाठी आंतर-संसदीय संघाच्या (IPU) अध्यक्ष पदावर नेमणूक झाली आहे. आंतर-संसदीय संघ (IPU) ही राष्ट्रीय संसदांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे.

नदी पुनरुज्जीवनात महाराष्ट्रातील सांगली जिल्हा देशात पहिला :

सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे. पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ घोषित झाले आहेत.

विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरूज्जीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पश्चिम विभागात चार राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दिडशे वर्षांपूर्वी वाहती होती.  

लुहरी जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी :

हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुलू जिल्ह्यात सतलज नदीवरील 1,810 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 210 मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक बाबींसंदर्भातील समितीने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे वार्षिक 75 कोटी युनिट वीज निर्मिती होईल.

सतलज जल विद्युत निगम लिमिटेडकडून प्रकल्पाची अंमलबजावणी बांधणी-मालकी-संचालन-देखभाल तत्त्वार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सक्रीय मदतीने केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी हिमाचल प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 नोव्हेंबर 2019 रोजी उद्घाटन केलेल्या रायजिंग हिमाचलवेळी स्वाक्षरी करण्यात आली होती. केंद्र सरकार या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधांच्या रुपाने 66 कोटी रुपये देत आहे, ज्यामुळे वीज बिल कमी होण्यास मदत झाली.

लुहरी पहिल्या टप्प्यातील प्रकल्प 62 महिन्यांत कार्यान्वित होईल. तसेच या प्रकल्पामुळे वार्षिक 6.1 लाख टन कार्बन उत्सर्जनात कपात होईल, याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेशला प्रकल्पाच्या 40 वर्षाच्या काळात 1140 कोटी रुपये किंमतीची मोफत वीज मिळेल. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना दहा वर्षांसाठी 100 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे.

Leave a Comment