चालू घडामोडी | 05 जुलै 2020

0

कनिष्ठ खेळाडूंसाठी ‘टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) ज्युनियर’ योजना जाहीर :

2024 पॅरिस ऑलंपिक आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलंपिक खेळांमध्ये वयाने लहान असलेल्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, युवा कल्याण व क्रिडा मंत्री किरेन रिजुजू यांनी ‘टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) ज्युनियर’ या योजनेची घोषणा केली आहे.

ही घोषणा “फिट है तो हिट है: फिट इंडिया” वेबिनार दरम्यान करण्यात आली. वयवर्ष 10-12 या वयोगटातल्या खेळाडूंसाठी ही योजना सुरू करण्याची सरकारची योजना आहे.

TOPS योजनेविषयी

  • भारत सरकारच्या केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने 2017 सालापासून वरिष्ठ गटातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना 50000 रूपयांचे मासिक मानधन देण्याची टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) सुरू केली आहे.
  • खेळाडूंना त्यांची तयारी करण्यास मदत देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रिडा विकास निधी (NSDF) मधून योजनेचा खर्च उचलला जातो. केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने खेळाडूंना त्यांची तयारी करण्यास मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार केली गेली आहे.
  • योजनेच्या अंतर्गत खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय मानदंडाला अनुसरून केली जाते. ऑलंपिक कार्यदलाने टोकियो ऑलंपिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मासिक मानधन देण्याची शिफारस केली होती.

मंगळयानाने टिपला मोठ्या चंद्राचा फोटो :

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) मंगळयान म्हणजे मार्स ऑर्बिटर मिशनने मंगळ ग्रहाच्या जवळच्या आणि सर्वात मोठा चंद्र फोबोसचे छायाचित्र पाठवले आहे.

एमओएमवर लावलेल्या मार्स कलर कॅमर्‍याने हे छायाचित्र टिपले आहे. एमसीसीने हे छायाचित्र 1 जुलैला त्यावेळेस टिपले होते, जेव्हा एमओएम मंगळ ग्रहापासून 7,200 किलोमीटर आणि फोबोसपासनू 4,200 किलोमीटर दूर होते.

फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्सड :

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्सह यांची निवड केली आहे. कोविड-19च्या साथीपाठोपाठ आर्थिक गर्तेत सापडलेल्या फ्रान्सला सावरू न शकल्याने पंतप्रधान एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला होता. गेली 3 वर्षं ते पंतप्रधानपदी होते. राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी फिलीप यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे.

‘आंध्रप्रदेश कॉर्पोरेशन फॉर आऊटसोर्स सर्व्हिसेस’ (APCOS) याचे उद्घाटन :

आंध्रप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या ‘आंध्रप्रदेश कॉर्पोरेशन फॉर आऊटसोर्स सर्व्हिसेस’ (APCOS) या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे 30 जून 2020 रोजी अमरावती येथे उद्घाटन करण्यात आले.

‘आऊटसोर्स’ म्हणजे कार्यालयात उपलब्ध असलेल्या क्षमतेचा वापर न करता मोबदला देऊन बाहेरून काम करवून घेणे, ज्यामुळे त्यांना पगार द्यावा लागत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here