चालू घडामोडी | 5 एप्रिल 2021

1

MPSC Current Affairs | 5 April 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • भारत देशात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) पाळला जातो.
 • महाराष्ट्र सरकारने आपल्या ‘खावटी’ अनुदान योजनेच्या अंतर्गत राज्यातील आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यासाठी 231 कोटी रुपयांच्या रकमेला मान्यता दिली.
 • मध्यप्रदेश सरकारने 3 एप्रिल 2021 रोजी ‘मिशन अर्थ’ कार्यक्रमाच्या अंतर्गत गोठे, जनावरांचा निवारा, कुरण विकास कामे आणि वीज उपकेंद्रांना समर्पित केले.
 • भोपाळ, मध्यप्रदेश येथे भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या लिंग-वर्गीकृत वीर्य उत्पादन प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले.
 • चित्रकूट आणि अयोध्या यांना जोडणारा 210 कि.मी. लांबीचा ‘राम वन गमन मार्ग’ तयार करण्याची ______ सरकारची योजना आहे – उत्तरप्रदेश.
 • _____ याने 32 दशलक्ष डॉलर खर्चाच्या “मिझोरम आरोग्य प्रणाली मजबुतीकरण प्रकल्प” याला मंजूरी दिली – जागतिक बँक.
 • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी “दुर्मिळ आजारविषयक राष्ट्रीय धोरण 2021” याला मान्यता दिली, ज्याचा दुर्मिळ आजारांवरील उपचारांचा खर्च कमी करणे आणि एक निमंत्रक म्हणून आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय याच्या सोबत स्थापन करण्यात येणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेच्या मदतीने स्वदेशी संशोधनावर भर देणे हा प्रमुख उद्देश आहे.
 • निवडक 1500 खेड्यांमध्ये वन धन विकास केंद्रे कार्यान्वित करण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (TRIFED) 1 एप्रिल 2021 पासून 100 दिवस चालणाऱ्या “संकल्प से सिद्धी” – व्हिलेज अँड डिजिटल कनेक्ट मोहीमेचा शुभारंभ केला.
 • ग्लोबल ईस्पोर्ट्स फेडरेशन (GEF) याचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – पॉल जे. फॉस्टर.
 • नायजर देशाचे राष्ट्रपती मोहम्मद बझौम यांनी ओहौमौदौ महमदौ यांची देशाचे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली.
 • भारताचे पहिले पर्यावरण मंत्री (1982-1984), ज्याचे 04 एप्रिल रोजी निधन झाले – वांकानेर दिग्विजयसिंह जाला.

आंबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित

महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्राला ‘जैविक विविधता वारसा स्थळ’चा दर्जा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महसुल व वन विभागाकडून हा दर्जा देण्याविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

ठळक बाबी

 • शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे.
 • शिस्टुरा हिरण्यकेशी हा एक रंगीबेरंगी लहान मासा आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात वाढतो. ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 • शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी घेतला.
 • वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे वारसाचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.
 • यापूर्वी राज्य सरकारने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here