चालू घडामोडी | 04 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘जम्मू व काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020’ याला मंजुरी दिली असून याद्वारे उर्दू, काश्मिरी, डोगरी, हिंदी आणि इंग्रजी या पाच अधिकृत भाषा निश्चित केल्या आहेत.

2) 1 सप्टेंबर रोजी यूएस ओपन 2020 स्पर्धेत खेळल्यानंतर 23 वर्षीय टेनिसपटू सुमित नागल हा गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम एकेरीतला मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

3) दरवर्षी 2 सप्टेंबर या दिवशी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. 2020 या वर्षी हा दिन “इन्व्हेस्ट इन कोकोनट टू सेव्ह द वर्ल्ड” या संकल्पनेखाली पाळला गेला आहे.

4) लडाख आणि लक्षद्वीप यांचा भारत सरकारच्या ‘एक राष्ट्र एक शिधापत्रिका’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. यासह या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशांची संख्या 26 झाली असून त्याचा सुमारे 65 कोटी लोकांना फायदा होणार आहे.

5) जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’ क्रमवारीत भारताला 48 वा क्रमांक दिला गेला आहे. या यादीत स्वित्झर्लंडने अव्वल स्थान कायम राखले आहे. स्वीडन दुसऱ्या तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य आणि दक्षिण आशियामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

6) रेल्वे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व्ही.के. यादव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे.

7) मर्कम कॅपिटल संस्थेनी तयार केलेल्या जागतिक सौर कंपन्यांच्या ताज्या क्रमवारीनुसार, अदानी ग्रुप (इंडिया) याची उपकंपनी असलेल्या अदानी ग्रीन या कंपनीला कार्यकारी सौर प्रकल्पांच्या बाबतीत प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलाय जगातील सर्वात मोठा सोलर ट्री :

  • पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये सीएसआयआर – सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने (सीएमईआरआय) त्यांच्या निवासी संकुलात सोलर ट्री बसवलं आहे.
  • हा जगातील सर्वात मोठा सोलर ट्री आहे. या सोलर ट्रीमधून ११.५ वॅटपेक्षा अधिक ऊर्जा निर्माण होईल. म्हणजेच वर्षाला १२,००० ते १४,००० स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्माण होईल. यातील सोलर ट्रीमध्ये ३५ फोटोव्होल्टाईक पॅनल लावले आहे.
  • यातून प्रत्येकी ३३० वॅट ऊर्जा निर्माण होते, अशी माहिती सीएसआयआर – सीएमईआरआयचे संचालक हरीश हिरानी यांनी दिलीये.

भारतीय सैनिकांना मिळणार AK-47 203 :

  • भारत आणि रशियाने अद्ययावत AK-47 203 रायफलींची डील फायनल केली आहे. जुन्या मॉडेलपेक्षा ही रायफल हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या किंवा कारगिलसारख्या उंच ठिकाणी लढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
  • यामुळे उंचीवर लपलेल्या शत्रूच्या सैनिकांना खालूनच अचूक टिपता येणार आहे. रशियाचे चॅनल स्पूतनिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्याला 7.7 लाख रायफली हव्या आहेत.
  • यापैकी एक लाख रायफली रशियात बनविल्या जाणार असून उर्वरित भारतात बनविल्या जाणार आहेत.

Leave a Reply