चालू घडामोडी | 4 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जगभरात ४ ऑक्टोबर हा दिवस ‘वर्ल्ड अॅनिमल डे’ म्हणजेच ‘जागतिक प्राणी दिवस’ म्हणून पाळला जातो.

2) 2 ऑक्टोबर 2020 रोजी गांधी जयंतीनिमित्त जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ भारत दिवस साजरा करीत स्वच्छ भारत पुरस्कारांचे वितरण केले. यात, विविध विभागात सर्वोत्कृष्ट ठरलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश, जिल्हे, तालुके, ग्रामपंचायत आणि इतर विविध श्रेणीतले तसेच सहा वर्षे राबवलेल्या अभियानाचे पुरस्कार देण्यात आले.

3) आदिवासी कामकाज मंत्री अर्जुन मुंडा यांनी गांधी जयंतीनिमित्त भारताची सर्वात मोठी हस्तकला आणि सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ- आदिवासी भारत ई-मार्केटप्लेसची आभासी सुरुवात केली.

4) चरणजीत सिंग अटारा यांची भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) पदावर नेमणूक झाली. ही नियुक्ती 01 ऑक्टोबर 2020 रोजी प्रशांत कुमार यांच्या जागी झाली.

5) राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेनी (NABARD) ग्रामीण भागात शाश्वत व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याकरिता मदत देण्यासाठी “वॉटर, सॅनीटेशन अँड हायजिन (WASH)’ कार्यक्रमासाठी पुनर्वित्त योजना सादर केली.

6) विशाखापट्टणम शहराजवळ भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरने 2 ऑक्टोबर 2020 रोजी रोजी बियाणे हवेतून जमिनीवर टाकले. हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

7) भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांनी “बोंगोसागर” नामक संयुक्त सागरी कवायत आयोजित केली. 3 ऑक्टोबर 2020 पासून तीन दिवस हा युद्धसराव चालणार आहे. यंदा या कवायतीचे हे दुसरे वर्ष आहे. दोन्ही देशांच्या नौदलांची ही संयुक्त कवायत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली.

8) छोट्या व्यवसायांना मदत करण्यासाठी आणि ग्राहकांच्या पाठिंब्याद्वारे मागणी वाढवण्यासाठी गुगल इंडियाने आपली ‘मेक स्मॉल स्ट्रांग’ अभियान मोहीम राबविली आहे.

भारताच्या ‘शौर्य’ची यशस्वी झेप; 800 किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता

भारताने शनिवारी ओडिशातील बालासोर येथे शौर्य या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अण्वस्त्र सज्ज आहे. हे क्षेपणास्त्र 800 किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. हे क्षेपणास्त्र सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेपणास्त्र यंत्रणेला मजबूत करणारे आहे. एलएसीवर चीनबरोबर तणाव सुरु असतानाच भारताने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.

सध्या भारताकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत वजनाला कमी आणि हाताळण्यासही हे क्षेपणास्त्र सोपे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र लक्ष्याकडे झेपावताना अखेरच्या टप्प्यात हायपरसोनिक वेग प्राप्त करतो.

भारताने याचदरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचेही यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र 400 किमी दूरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. मागील क्षेपणास्त्राच्या क्षमतेपेक्षा 100 किमीने हे अंतर जास्त आहे.

शौर्य क्षेपणास्त्राचे पहिले परीक्षण 2008 मध्ये ओडिशाच्या चांदीपूर येथे करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये याचे दुसरे परीक्षण करण्यात आले होते. पूर्वी याची क्षमता 750 किमी इतकी होती.

शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे पेयजल पुरवठ्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा 100 दिवसांचा अभियान :

देशभरातल्या शाळकरी बालकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केंद्रीय जल शक्ती गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 2020 रोजी देशभरातल्या सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे पेयजल पुरवठा करण्यासाठी 100 दिवसांच्या विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान, पुढच्या 100 दिवसांमध्ये गावातल्या सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि इतर सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा ठराव संमत करण्यासाठी ग्रामसभा लवकरात लवकर बोलावण्यात येणार.

जल जीवन मिशन अंतर्गत बालकांना जलयुक्त आजारांची लागण होण्याची जोखीम जास्त असल्यामुळे त्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे याला प्राधान्य देण्यात आले आहे.

Leave a Comment