चालू घडामोडी | 04 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) हरप्रीत ए. डी सिंग यांची एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विमानचालन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली पहिली महिला ठरली.

2) केरळच्या वेली गावात देशातल्या पहिल्या सौर-चालित रेलगाडीचे उद्घाटन झाले.

3) परवडणार्याे किंमतीचे फ्युल सेल-ग्रेड हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय विज्ञान संस्था (IISc, बंगळुरू) या संस्थेनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) सोबत करार केला आहे.

4) पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात भारतातले पहिले ‘टायर उद्यान’ तयार करण्यात आले आहे. उद्यानाला ‘द एसप्लान्डे बस डेपो’ असे नाव देण्यात आले आहे. कचरा बनलेल्या टायरांचा वापर करून उद्यान तयार करण्यात आले आहे.

5) मध्यप्रदेशातले ‘पन्ना जीवावरण अभयारण्य’ संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) ‘मॅन अँड बायोस्फीअर’ कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

6) आसाम लोकसेवा आयोगाने राज्य नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये ‘ट्रान्सजेंडर’ हा नवा पर्याय सादर केला आहे.

7) न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.

8) भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये भारताचे पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.

“मिशन सागर-2”: INS ऐरावत सुदान बंदरामध्ये दाखल :

भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले.

या मोहिमेमध्ये भारत सरकारच्या वतीने आपल्या मित्र देशांना नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. सुदानच्या जनतेसाठी भारताने दिलेल्या 100 टन अन्नधान्याची मदत INS ऐरावतमार्फत पाठविण्यात आली आहे.

मलबार-20: बहुपक्षीय सागरी कवायत :

‘मलबार’ सागरी कवायतीच्या 24 व्या आवृत्तीचे आयोजन नोव्हेंबर 2020 महिन्यात दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.

  • पहिला टप्प्याचे आयोजन दि. 3 ते 6 नोव्हेंबर 2020 मध्ये होणार आहे. विशाखापट्टणम येथे बंगालच्या खाडीत ही संयुक्त कवायत होणार आहे.
  • द्वितीय टप्प्याचे आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या मधात अरबी सागरात करण्यात येणार आहे.

‘मलबार 20’ याच्या पहिल्या टप्प्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलांची पथके सहभागी होणार आहेत.

कवायतीमध्ये भारतीय नौदलाच्यावतीने विनाशक रणविजय, युद्ध नौका शिवालिक, तैनाती जहाज सुकन्या, पुरक जहाज शक्ती आणि पाणबुडी सिंधुराज यांचा सहभाग असणार आहे. याच्याच जोडीला अत्याधुनिक जेट ट्रेनर हॉक, लांब पल्ल्याचे तैनाती पी-81, डॉर्नियर आणि हेलिकॉप्टर यांचाही सहभाग संयुक्त कवायतीमध्ये असणार आहे.

Leave a Comment