चालू घडामोडी | 04 जुलै 2020

भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला :

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे. नुकताच भारतीय रेल्वेनं 8.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं शेषनाग असं नाव दिलं आहे.

भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेनं रेषनाग या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडून तयार केली आहे.

या मालगाडीत एकूण 251 डबे जोडण्यात आले होतं. तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.

पर्यटनाला चालना देणारे ‘अखिल भारतीय पर्यटक वाहने अधिकृत मंजुरी आणि परवाना नियम-2020’:

देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ अंतर्गत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे.

राष्ट्रीय परवाना प्रणालीच्या अंतर्गत मालवाहू वाहनांच्या यशानंतर मंत्रालय पर्यटक प्रवासी वाहनांची अखंडित हालचाल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उद्देशाने नवीन नियमांचा एक संच तयार करण्यात आला असून याला “अखिल भारतीय पर्यटक वाहन अधिकृत मंजुरी आणि परवाना नियम-2020” म्हणून ओळखले जाणार आहे.

या नवीन योजनेनुसार,

  • कोणतेही पर्यटक वाहन चालक (ऑपरेटर) ऑनलाईन पद्धतीने “अखिल भारतीय पर्यटक अधिकृत मंजुरी/परवाना” साठी अर्ज करू शकतात.
  • अधिकृत मंजुरी/परवान्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर 30 दिवसांच्या आत नियमात नमूद केल्यानुसार सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि यासाठी देशभरात लागू असलेले शुल्क जमा केल्यानंतर अधिकृत मंजुरी/परवाना दिला जाणार.
  • या योजनेमध्ये जसे प्रकरण असेल त्यानुसार अधिकृत मंजुरी/परवान्याच्या स्वरुपात लवचिकतेचा समावेश करण्यात आला आहे आणि हे तीन महिन्यासाठी किंवा एकावेळी बहुसंख्य, परंतु तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वैध नसणार.
  • देशातल्या काही भागातला पर्यटनाचा मर्यादित हंगाम आणि ज्यांची आर्थिक क्षमता मर्यादित आहे, अशा चालकांचा विचार करून ही तरतूद समाविष्ट केली आहे.
  • याच्या संदर्भात एक केंद्रीय माहिती संग्रह तयार केला जाणार, ज्यामुळे पर्यटकांची हालचाल सुलभ होणार आणि पर्यटनाला चालना मिळेल आणि अशा नोंदणीद्वारे मिळणारा महसूल वाढण्यास मदत देखील होणार आहे.
  • सध्या अस्तित्वात असलेले सर्व परवाने त्यांच्या वैधते दरम्यान लागू होतील.

फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा :

फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा फेरबदल अपेक्षित मानला जात होता.

अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे.

महामार्ग बांधकाम क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी NHAIचे ‘पायाभूत गुंतवणूक न्यास’ :

महामार्ग बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘पायाभूत गुंतवणूक न्यास’ (InvIT) स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावित न्यासाचे कामकाज पाहण्यासाठी एका गुंतवणूक व्यवस्थापक मंडळाच्या नियुक्तीसाठी समितीची निर्मिती करण्यात आली आहे.

या गुंतवणूक व्यवस्थापन मंडळामध्ये दोन स्वतंत्र संचालक आणि एका अध्यक्षाचा समावेश असणार. यांची निवड करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. NHAIचे अध्यक्ष डॉ. सुखबिर सिंग संधू या समितीचे संयोजक आहेत. इतर सदस्यांमध्ये HDFCचे अध्यक्ष दिपक पारेख, ICICI बँकेचे अध्यक्ष गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे माजी सचिव संजय मित्रा यांचा समावेश आहे.

ठळक बाबी

  • पायाभूत गुंतवणुकीसाठी तसेच देशातल्या कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी संस्थेनी प्रायोजित केलेल्या स्वतंत्र न्यासाची स्थापना करणारे NHAI हे देशातले पहिले प्राधिकरण ठरत आहे.
  • गुंतवणुकीचे सुनियोजित व्यवस्थापन करण्यासाठी व्यवसायिक व्यवस्थापकीय रचना असणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेवून या न्यासाची स्थापना करण्यात येणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या महामार्ग प्रकल्पांमधून पुरेशी कमाई व्हावी आणि त्यासाठी बाजारपेठेतून संसाधने एकत्रित करून व्यवसायिकतेने पायाभूत न्यास चालवण्यासाठी तज्ज्ञांची एक सक्षम संस्था स्थापन करण्याची कल्पना यामागे आहे.

Leave a Comment