चालू घडामोडी | 4 एप्रिल 2021

MPSC Current Affairs | 4 April 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • पश्चिम घाटात दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेली ‘अर्जिरिया’ या वंशतल्या फुल-वनस्पतीची नवीन प्रजाती – ‘अर्जिरिया शरदचंद्रजी’ (कॉन्व्होल्व्हुलेसी).
 • जम्मूच्या भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM जम्मू) याच्या परिसरात ‘आनंदम: सेंटर फॉर हॅपीनेस’ या केंद्राची स्थापना झाली.
 • मार्च 2021 मध्ये भारत आणि अमेरिका या देशांचा ‘वज्र प्रहार 2021’ ही सैन्य कवायत भारतात बकलोह (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित केली गेली होती.
 • 31 मार्च रोजी गुजरातच्या सुरत शहरातील हजिरा बंदर आणि दीव बेट दरम्यान नवीन क्रूझ सेवा सुरू झाली.
 • मेरिक ब्रायन गारलँड हे मार्च 2021 पासून संयुक्त राज्ये अमेरिका देशाचे 86 वे महान्यायवादी (Attorney General) आहेत.
 • सरला साहित्य संसद याच्यावतीने देण्यात आलेल्या ‘कलिंग रत्न 2021’ पुरस्काराचा प्राप्तकर्ता – विश्व भूषण हरीचंदन (आंध्रप्रदेशाचे राज्यपाल).
 • मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर धरणावर 600 मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे.
 • ‘अकॅडेमीक रॅंकिंग ऑफ वर्ल्ड यूनिवर्सिटीज’ (ARWU 2020) याच्या यादीत भारतातील सर्वोत्कृष्ट उच्च शिक्षण संस्था म्हणून प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc बंगळुरू).
 • ‘अकॅडेमीक रॅंकिंग ऑफ वर्ल्ड यूनिवर्सिटीज’ (ARWU 2020) याच्या यादीत भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून प्रथम क्रमांक – कलकत्ता विद्यापीठ.
 • ____ याने मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेत बसणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘ई-परीक्षा’ नावाचे एक ऑनलाइन संकेतस्थळाचे अनावरण केले – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ.
 • वार्षिक ‘ग्लोबल टीचर प्राइज’ या पुरस्कारामागील प्रेरणा ठरणारे केरळचे शिक्षक, ज्यांचे 2 एप्रिल 2021 रोजी निधन झाले – मरीअम्मा वर्के.

NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) अभियान :

पृथ्वी निरीक्षण उपग्रहावर ड्युअल-फ्रीक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडारच्या विकासासाठी ‘NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार’ (NISAR) अभियान 2022 साली श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले जाण्याचे नियोजित आहे.

प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात केलेल्या प्रयोगातून हे निष्पन्न झाले आहे की, NISAR टेनिस कोर्टच्या अर्ध्या आकाराच्या क्षेत्रामध्ये पृथ्वीच्या अगदी 0.4 इंच पृष्ठभागावरील होणारी हालचाल शोधू शकतो.

NISAR प्रकल्पाविषयी-

 • नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) हे संयुक्तपणे 1.5 अब्ज डॉलर खर्चून ‘NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार’ (NISAR) नावाचा जगातील सर्वात महागडा पृथ्वी निरीक्षण उपग्रह विकसित करीत आहेत.
 • उपग्रह 2,200 किलोग्रॅम वजनी असणार आणि प्रगत रडार इमेजिंग तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचे एक तपशीलवार दृश्य प्रदान करेल.
 • पर्यावरणाचा असमतोलपणा, पृथ्वीच्या गोलार्धातील बर्फाचा वितळणारा थर आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारखी नैसर्गिक संकटे अश्या पृथ्वीच्या काही सर्वात जटिल प्रक्रियांचे निरीक्षण आणि मोजमाप ते करणार आहे.
 • या उपग्रहामध्ये NASA चे L-बॅन्ड (24 सेंटीमीटर तरंगलांबी) पोलरिमेट्रिक SAR आणि ISRO चे S-बॅन्ड (12 सेंटीमीटर तरंगलांबी) पोलरिमेट्रिक SAR ही वैज्ञानिक उपकरणे प्रस्थापित करण्यात येतील.
 • हा उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाची माहिती गोळा करू शकणार.
 • उपग्रहामार्फत संकलित होणाऱ्या माहितीमुळे पृथ्वीच्या जमिनीची स्थिती उघड होणार आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना ग्रहांच्या प्रक्रिया आणि हवामान बदल समजून घेता येईल आणि भविष्यातील संसाधन आणि धोके व्यवस्थापीत होण्यास मदत होईल.

जागतिक आर्थिक मंचचा ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’

जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेने त्याचा वार्षिक ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ हा अहवाल प्रकाशित केला आहे.

अहवालातील ठळक बाबी

 • जगातील सर्वाधिक स्त्री-पुरुष समानता ठेवणारा देश – आइसलँड
 • स्त्री-पुरुष समानता ठेवण्याच्या बाबतीत आइसलँड खालोखाल फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, रवांडा, स्वीडन, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रमांक लागतो आहे.
 • स्त्री-पुरुष समानता ठेवणाऱ्या 156 देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक 140 वा लागतो. यंदाच्या क्रमवारीत 28 स्थानांची घसरण झाली आहे.
 • भारत स्त्री-पुरुष समानता ठेवण्याच्या बाबतीत दक्षिण आशियातील तिसरा सर्वात वाईट कामगिरी करणारा देश ठरला आहे.
 • भारताचे शेजारी, बांगलादेश 65 वा, नेपाळ 106 वा, श्रीलंका 116 वा, अफगाणिस्तान 156 वा, भूटान 130 वा आणि पाकिस्तान 153 व्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment