चालू घडामोडी | 30 जून 2020

रशियाची एनर्जिया कंपनी 2023 साली स्पेस वॉक करण्यासाठी पर्यटक पाठविणार :

अंतराळात स्पेस वॉक करण्यासाठी खासगी पर्यटकांना पाठविण्याच्या शर्यतीत रशियाच्या एनर्जिया स्पेस कॉर्पोरेशन या कंपनीने देखील उडी घेतली आहे. कंपनी 2023 साली अंतराळ प्रवासी पाठविणार अशी योजना तयार करण्यात आली आहे.

त्यासाठी अमेरिकेच्या स्पेस अँडव्हेंचर या कंपनीसोबत एनर्जिया कंपनीने करार केला आहे, ज्याच्यानुसार 2023 साली 2 अंतराळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) स्पेस वॉकसाठी नेले जाणार आहे.

मोहिमेत सहभागी झालेल्या एकाला रशियाच्या नेतृत्वात एका प्रशिक्षित रशियन अंतराळयात्रीसह स्पेसवॉक करू दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या NASA संस्थेने खासगी अंतराळ मोहिमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिचर्ज ब्रॅनसनच्या व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेस टुरिझम कंपनीसोबत करार केला आहे.

ही कंपनी अंतराळयात्रींना अंतराळ पर्यटनासाठी पाठण्याच्या दिशेने काम करते. तसेच स्पेसएक्स कंपनीने देखील मार्चमध्ये घोषणा केली होती की क्रू ड्रॅगनमार्फत पुढच्या वर्षी तीन जणांना अंतराळ पर्यटनासाठी घेऊन जाणार.

नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले :

भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले आहे. मेनन हे ‘एलिट’ पंचांमध्ये स्थान मिळवणारे सर्वात तरुण पंच ठरले आहेत. आगामी 2020-21 हंगामासाठी इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी मेनन यांची निवड झाली आहे.

36 वर्षीय मेनन यांनी तीन कसोटी, 24 एकदिवसीय आणि 16 ट्वेन्टी-20 लढतींमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ‘आयसीसी’च्या मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवणारे मेनन हे श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी यांच्यानंतर भारताचे तिसरे पंच आहेत.

‘‘आयसीसीच्या जगातील मुख्य पंच आणि सामनाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळवावे, हे सुरुवातीपासून स्वप्न होते. अजूनही विश्वास बसत नाही,’’ असे मेनन यांनी सांगितले.

६ राफेल लढाऊ विमानांची तुकडी २७ जुलैपर्यंत भारतात :

सहा राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला २७ जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २ जूनला त्यांच्या फ्रान्सच्या समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

फ्रान्समधील करोना महासाथीचा परिणाम न होता राफेल जेट विमाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारताला दिली जातील, असे या वेळी त्यांनी सांगितले. या विमानाची पहिली स्क्वाड्रन हवाई दलाच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल.

चंदीगडमध्ये तात्काळ बॅटरी विनिमयाची सुविधा कार्यरत :

26 जून 2020 रोजी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक असलेले व्ही. पी. सिंग बदनोर यांच्या समवेत पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते व्हीडियो कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून ‘बॅटरी विनिमयाची जलद देवाणघेवाण करणाऱ्या सेवेचे’ (QIS) चंदीगड येथे उद्घाटन करण्यात आले. बॅटरीच्या देवाणघेवाणीची ही पध्दत धीम्या गतीने बॅटरी चार्ज करण्यासाठी आणि उत्कृष्ट अशी असून त्यामुळे वाहनचालकांचा परिचलन वेळ वाचतो.

  • बॅटरी विनिमयाचे हे प्रारुप सध्या व्यवसायिक विभागासाठी म्हणजे विजेवर चालणारी वाहने, रिक्षा, विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि विजेवर चालणाऱ्या कारखान्यात तयार केलेली अथवा कारखान्याबाहेर तयार केलेल्या वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे.
  • इंडियन ऑईल कंपनीने निवडक शहरांतल्या त्याच्या किरकोळ विक्रीकेंद्रांतून विजेवर चालणाऱ्या वाहनांकरीता जलद बॅटरी विनिमयाच्या प्रारुपाची सोय करण्याची यंत्रणा उभी करून बघण्यासाठी सन मोबिलिटी या उद्योगासोबत अबंधनकारक सहकार्य करार केला आहे.
  • इंडियन ऑईल विजेवर चालणाऱ्या गाड्या, रिक्षा, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षा या वाहनांकरिता देशातल्या निवडक शहरांमध्ये 20 ते 25 क्विक इंटरचेंज स्टेशन (QIS) सुरू करून प्रायोगिक तत्वावर ‘स्मार्ट मोबिलिटी पोप्रायटी सोल्युशन्स’ (SMPLs) सुविधा उभी करण्याच्या विचारात आहे.
  • नवी दिल्ली, गुरूग्राम, बेंगळुरू, चंदीगड, अमृतसर आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये 20 QIS बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. वर्तमानात, ऊर्जेच्या वापरात भारत विश्वात तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

Leave a Comment