चालू घडामोडी | 30 जुलै 2020

केंद्र सरकार 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करणार :

अर्थमंत्रालयाने 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्याची योजना तयार केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली आहे.

प्रस्तावानुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या 23 सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलांची खासगी क्षेत्राला विक्री केली जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 2.10 लक्ष कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.

त्यापैकी 1.20 लक्ष कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधून तर 90 हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळतील.

निर्गुंतवणूक म्हणजे काय?

  • निर्गुंतवणूक म्हणजे सरकारच्या मालकी हक्कातल्या सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, प्रकल्प किंवा इतर मालमत्तेची विक्री करणे होय. सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या किंवा विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया चालवली जाते. आणि प्राप्त निधीतून इतर नियमित स्रोतांकडून होणाऱ्या महसुलातली तूट भरून काढता येते.

भारतीय भूमीवर झाले राफेलचे ‘हॅप्पी लँडिग :

फ्रान्सकडून झेपावलेली राफेल घातक लढाऊ विमाने भारतीय भूमीवर उतरली आहेत. फ्रान्सच्या बोरदू शहरातील मेरिगनेक हवाई तळावरून ७००० किलोमीटरचे अंतर पार करून ही विमाने भारतीय हवाई हद्दीत आली तेव्हा दोन सुखोई ३० एमकेआय विमानांनी त्यांचे स्वागत केले व अंबालापर्यंत आणले.

जगभरातील सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये समावेश असलेल्या राफेलचा ५९,००० कोटी रुपयांचा सौदा एनडीए सरकारने २३ सप्टेंबर २०१६ रोजी केला होता. एकूण ३६ विमाने भारत खरेदी करणार आहे. आज आलेल्या ५ विमानंपैकी तीन विमाने एक आसनी तर दोन विमाने दोन आसनी आहेत. त्यांना अंबालास्थित स्क्वाड्रन१७मध्ये समाविष्ट केले जाईल.

भारताला आतापर्यंत एकूण १० विमाने पुरवण्यात आली असून, त्यापैकी पाच विमाने प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच ठेवलेली आहेत. खरेदी केलेली राफेलची सर्व ३६ विमाने २०२१पर्यंत भारतात येणार आहेत.

“लिफास कोविड स्कोअर”: कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल :

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तपासणीच्या माध्यमातून पारंपारिक चाचणीला प्राधान्य देण्यासाठी रोगाचे लवकर निदान आणि जोखीम मूल्यमापनासाठी पूरक नाविन्यपूर्ण तांत्रिक पद्धती शोधण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड-19 हेल्थ क्रिसिस (CAWACH / कवच) या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या उपक्रमाने “लिफास कोविड स्कोअर” नावाने कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बंगळुरूच्या अकुली लॅब या स्टार्टअप कंपनीची निवड केली आहे.

कवच उपक्रमाबाबत

  • राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळ (NSTEDB), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, केंद्र सरकार यांचा ‘कवच’ हा उपक्रम कोविड-19 च्या नियंत्रणासाठी बाजारात आणण्यासाठीच्या नवकल्पना आणि स्टार्टअप कल्पनांना बळ देत आहे.
  • विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान लक्षणे नसलेल्या व्यक्तीमधील संभाव्य संसर्ग शोधेल तसेच लक्षणे न आढळणारी व्यक्ती बाधित होण्याच्या जोखमीचे मूल्यमापन करणार.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं पुन्हा ‘शिक्षण मंत्रालय’ असं नामकरण :

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. हे नाव बदलून त्याचे शिक्षण मंत्रालय असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 30 जुलै 2020”

Leave a Comment