चालू घडामोडी | 30 ऑगस्ट 2020

मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांनी ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकला :

2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना दिला जाण्याचे जाहीर झाले आहे. बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखक ठरल्या आहेत.

“द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी त्यांना हा पारितोषिक दिला गेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक हा ब्रिटनमध्ये (UK) दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे.

‘मॅन ग्रुप’ या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार इंग्रजी भाषेत प्रकाशित होणार्‍या कल्पित साहित्यासाठी तसेच किंवा सामान्यत: इंग्रजी भाषेत भाषांतरित केल्या गेलेल्या साहित्यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या जिवंत लेखकाला दिला जातो.

रशियातील लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय :

रशियामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. रशियाच्या दक्षिणेकडील अस्त्रखान प्रदेशात १५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या लष्करी कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे भारताने गेल्या आठवडय़ात रशियाला कळविले होते.

भारताने यापूर्वी सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय का बदलला याबाबत अधिकृत कारण दिलेले नाही, मात्र कवायतींमध्ये चीन आणि पाकिस्तानही सहभागी होणार असल्याने भारताने निर्णय बदलला, असे याबाबतच्या घडामोडींशी संबंधित व्यक्तींनी सांगितले.

चीन, पाकिस्तान आणि शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) अनेक सदस्य देश या कवायतींमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. संरक्षण क्षेत्रात रशिया हा भारताचा मोठा भागीदार देश आहे आणि दोन्ही देशांमधील सहकार्य अधिकाधिक दृढ झाले आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ :

क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आल्याची घोषणाही केली. या वर्षापासून अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे १५ आणि २५ लाखांचं मानधन दिलं जाणार असल्याचं रिजीजू यांनी जाहीर केलं.

राष्ट्रपती भवनात आजच्या दिवशी सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येतो. यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आज राष्ट्रपती भवनात पार पडणारा कार्यक्रम हा व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला जाणार आहे.

वन लाइनर चालू घडामोडी

  • भारत देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. वर्ष 2021 मध्ये भारताला BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) या आंतरराष्ट्रीय गटाचे अध्यक्षपद मिळणार आहे.
  • 27-28 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय उर्दू भाषा प्रसार परिषद (NCPUL) यांच्यावतीने ‘जागतिक उर्दू परिषद’चे आयोजन करण्यात आले होते.
  • 28 ऑगस्ट 2020 रोजी ‘भारत-सिंगापूर संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्र’ची 14वी फेरी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे पार पडली. यात संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि सिंगापूरचे सचिव (संरक्षण) चान हेंग नी यांनी संयुक्त अध्यक्षपद भुषवले.

Leave a Comment