चालू घडामोडी | 03 सप्टेंबर 2020

0
चालू घडामोडी 03 सप्टेंबर 2020

आंतरराष्ट्रीय रँकिंग, पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही :

जागतिक उत्कृष्ट विद्यापीठांची यादी दि. २ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पहिल्या ३०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेला आपले स्थान मिळविता आले नाही.

विशेषत: या मानांकनासाठी भारतातून सर्वाधिक ६३ शिक्षणसंस्थांनी सहभाग घेतला होता. दुसरीकडे भारताचा शेजारी व कट्टर प्रतिस्पर्धी चीनच्या सिन्हूआ विद्यापीठाने सर्वाेत्कृष्ट पहिल्या २० मध्ये स्थान निश्चित करीत २० व्या स्थानी मान पटकावला आहे.

दरवर्षी जगातील सर्वाेत्कृष्ट विद्यापीठ, शिक्षणसंस्थांचे विविध निकषांनुसार मानांकन जाहीर केले जाते. भारतातील आयआयटी, आयआयएससारख्या ६३ संस्थांनी मानांकनासाठी पात्रता मिळवली. मात्र निकषांवर न उतरल्याने पहिल्या ३०० क्रमांकांमध्ये एकाही संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही.

पहिल्या दोनशे शिक्षणसंस्थांच्या यादीत अमेरिकेच्या सर्वाधिक ५९ संस्थांचा समावेश आहे. अमेरिकेनंतर इंग्लंड २९ व जर्मनीच्या २१ संस्थांचा समावेश आहे. टाईम्सने सुमारे ९३ देशांमधील १५२७ संस्थांची पडताळणी केली.

हिंद-प्रशांत प्रदेशात पुरवठा साखळींचा लवचिकपणा वाढविण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जापान या देशांचा पुढाकार :

भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री सायमन बर्मिंगहॅम आणि जापानचे अर्थ मंत्री काजियामा हिरोशी या मंत्र्यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक झाली.

एक मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक, भेदभाव नसलेला, पारदर्शक, आणि स्थिर व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण देत आणि आपल्या बाजारपेठा खुल्या ठेवण्यात पुढाकार घेण्याचा दृढ निश्चिय मंत्र्यांनी व्यक्त केला.

वन लायनर चालू घडामोडी

  • भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरवरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘AUDFs01’ असे नाव दिले आहे.
  • चारू सिन्हा या श्रीनगर क्षेत्रासाठी नेमण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) प्रथम महिला महानिरीक्षक आहेत.
  • 2 सप्टेंबर 2020 रोजी नायजेरिया आणि भारत या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राजकीय, आर्थिक आणि व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा, विकासात्मक मदत आणि संस्कृति याविषयी सहकार्य करण्यासाठी चर्चा केली.
  • दरवर्षी सप्टेंबर महिन्यात महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे ‘पोषण महिना’ (पोषण माह) आयोजित केला जातो.
  • अवीक सरकार यांची पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
  • व्हाइस अ‍ॅडमिरल एस. आर. शर्मा यांनी भारतीय नौदलाचे ‘चीफ ऑफ मटेरिअल’ म्हणून 01 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here