चालू घडामोडी | 3 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) सिक्कीम हे देशातील पहिले 100 टक्के सेंद्रिय राज्य आहे. त्याची सर्व शेतजमीन प्रमाणित सेंद्रिय आहे.

2) भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन माय सहेली’ उपक्रमाचा आरंभ केला आहे. सध्या ही सुविधा हावडा-मुंबई स्पेशल, हावडा-यशवंतपूर दुरंतो स्पेशल आणि हावडा-अहमदाबाद स्पेशल अशा तीन गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. उपनिरीक्षक पथके महिला प्रवाशांचे आसन क्रमांक आणि संपर्क गोळा करणार आणि संपूर्ण प्रवासात त्यांच्याशी संपर्कात असणार.

3) वृद्ध व्यक्तीचे कुटुंब, समुदाय आणि समाजातील योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि वृद्धत्वाच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानी जाहीर केल्यानुसार दरवर्षी 1 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 2020 साली “पॅंडेमीक्स: डू दे चेंज हाऊ वी अॅड्रेस एज अँड एजिंग?” या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला गेला.

4) ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेच्या अंतर्गत 26 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय पोर्टेबिलिटी समूहात 1 ऑक्टोबर 2020 रोजी तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश ही दोन राज्ये जोडली गेली.

5) केरळ राज्यातल्या पलक्कड जिल्ह्यात राज्यातला पहिला मेगा फूड पार्क उभा करण्यात आला आहे. हा प्रकल्प अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला चालना देणार.

6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग येथे अटल बोगद्याचे उद्घाटन झाले. तो 9.02 किलोमीटर लांबीचा महामार्गावरचा जगातला सर्वाधिक दीर्घ बोगदा आहे.

7) आर्कटिक प्रदेशात “झोम्बी फायर” नामक अग्नि पहायला मिळाला, जो वेगाने बदलत असतो. या अग्निमुळे जमिनीखालून केवळ धुर निघतो, मात्र ज्वाळा दिसत नाही.

8) दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा (SAI) नवीन लोगो लॉन्च केला.

ITI कंपनी भारतीय भुदलासाठी ‘ASCON-IV’ ही दूरसंवाद प्रणाली तयार करणार :

सुरक्षेबाबतच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय भुदलासाठी “आर्मी स्टॅटीक स्विच्ड कम्युनिकेशन नेटवर्क (ASCON)” या दूरसंवाद प्रणालीच्या चौथ्या टप्प्याचे काम सुरु करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही यंत्रणा ITI लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्थेमार्फत उभारली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे भारतीय लष्कराला कोणत्याही अतिदुर्गम प्रदेशात अधिक चांगली संपर्क क्षमता, उत्तम प्रतिसाद शक्ती आणि उच्च दर्जाची बँडविड्थ उपलब्ध होणार. भारतीय सीमेजवळ, नियंत्रण रेषेजवळ तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ विस्तृत क्षेत्रावर वाढीव दूरसंवाद जाळ्याचा लाभ मिळणार.

पंतप्रधानांच्या हस्ते ‘वैभव परिषदे’चे उद्घाटन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 2020 रोजी “वैश्विक भारतीय वैज्ञानिक (VAIBHAV / वैभव) शिखर परिषदेचे उद्घाटन झाले. ती परदेशी आणि निवासी भारतीय संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांची आभासी परिषद असून 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2020 या काळात या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

जागतिक पातळीवरती विकासासाठी शैक्षणिक आणि संशोधन तसेच तंत्रज्ञान आधार बळकट करण्यासाठी सहयोग यंत्रणेवर चर्चा करण्यासाठी जगभरातल्या शैक्षणिक संस्था तसेच संशोधन व विकास संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या नामांकित व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणणे हा या परिषदेचा हेतु आहे. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 शैक्षणिक संस्था तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभाग परिषदेचे आयोजन करीत आहे.

भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप :

भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली.

या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात २९१ तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात २८० गुण जमा आहेत.

Leave a Comment