चालू घडामोडी | 03 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) चालू महिन्यात मलबार नौदल व्यायामाची 24 वी आवृत्ती दोन टप्प्यात नियोजित आहे. 2) राजस्थान विधानसभेने राजस्थान महामारी रोग (सुधारणा विधेयक 2020) मंजूर केले असून मास्क घालणे बंधनकारक आहे.

3) महाराष्ट्र कॅडर 1988 च्या तुकडीच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी राजीव जलोटा यांची केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPT) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4) देशभरातल्या सर्व न्यायालयांमध्ये इलेक्ट्रोनिक पद्धतीने खटले दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले ई-स्त्रोत केंद्र ठरलेले ‘न्याय कौशल’ याचे उद्घाटन मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी महाराष्ट्राच्या नागपूर शहरातल्या न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेत केले.

5) आयुष क्षेत्राची नियोजित आणि पद्धतशीर वाढ सुलभ करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि इनव्हेस्ट इंडिया “स्ट्रॅटेजिक पॉलिसी अँड फॅसिलिटेशन ब्युरो (SPFB)” नावाचे एक धोरणात्मक केंद्र स्थापन करण्यासाठी सहकार्य करणार आहे. आयुष क्षेत्राच्या हितधारकांसाठी भविष्यातल्या दिशा आखण्यासाठी मंत्रालयाने चालविलेल्या विविध उपायांपैकी हे एक आहे. SPFB विभाग मंत्रालयाला सामरिक आणि धोरणात्मक उपक्रमात मदत करणार ज्यामुळे या क्षेत्राच्या पूर्ण क्षमतांचा वापर होऊन विकास आणि गुंतवणूकीला चालना देण्यास मदत होणार.

6) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घोषणा केली की  महिला T20 चॅलेंज 2020चे शीर्षक प्रायोजक रिलायन्स जिओ असेल.

7) केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी IIT मुंबईने त्याच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या “बंधू” नामक स्व-मदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन केले. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या ताणापासून, अभ्यासाचा ताण आणि मानसिक आरोग्य या सारख्या सर्वप्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘बंधू’ सहाय्य करणार आहे.

8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 02 ऑक्टोबर 2020 रोजी गांधी जयंतीदिनी, वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) या निवासी आणि अनिवासी भारतीय वैज्ञानिक/ शिक्षण तज्ज्ञांच्या जागतिक आभासी शिखर परिषदेचे उद्घाटन केले होते आणि काल या परिषदेचा समारोप झाला.

9) युरोपियन कमिशन आणि भारतीय सामाजिकशास्त्र संशोधन परिषद (ICSSR) यांनी वैज्ञानिक सहकार्य वाढविण्यासाठी एक करार केला आहे.

न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री :

न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.

अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे. भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन ४१ वर्षांच्या असून सिंगापूरला शिकलेल्या आहेत. नंतरचे शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला.

त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये निवडून आल्या. २०१९ मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी राजकीय जम बसवून काम केले. आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री आहेत.

आकस्मिक पत मर्यादा हमी योजनेचा कालावधी एका महिन्याने वाढविला :

केंद्र सरकारने आकस्मिक पत मर्यादा हमी योजनेला (ECLGS) एक महिन्याची मुदतवाढ दिली असून योजना आता 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेमधून आत्तापर्यंत दोन लक्ष कोटी रुपयांपेक्षा जास्त वित्त पुरवठा करण्यासाठी कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 60.67 लक्ष व्यवसायिकांनी कर्ज घेतले असून त्यांना 2.03 लक्ष कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आत्तापर्यंत 1.48 लक्ष कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. कोविड-19 महामारीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीची झळ MSME क्षेत्रातल्या उत्पादन आणि इतर व्यवहारांना बसली आहे.

या पार्श्वभूमीवर आकस्मिक कर्ज हमी योजना तयार करण्यात आली. MSME उद्योगांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांना तीन लक्ष कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची संपूर्ण हमी देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

Leave a Comment