चालू घडामोडी | 03 मार्च 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 3rd March 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • जगभर ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या २०१३ च्या अधिवेशनात, ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला गेला.
 • 2021 साली ‘जागतिक वन्यजीव दिन’ (3 मार्च) याची संकल्पना – “फॉरेस्ट अँड लाईव्हलीहूड: सस्टेनिंग पीपल अँड प्लॅनेट”.
 • केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्यवतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ कार्यक्रमाच्या सहाव्या सत्राच्या म्हणजे 2021 या वर्षीच्या क्षेत्र मुल्यांकनाला 1 मार्च 2021 रोजी सुरुवात झाली.
 • “टाकाऊ ते टिकाऊ” (वेस्ट टू वेल्थ) अभियाना अंतर्गत भारत सरकारच्या ____ याने कचरा व्यवस्थापन आव्हानाचा सामना करणाऱ्या विद्यार्थी, समाजसेवक/स्वयं सहाय्यता गट आणि नगरपालिका/सफाई कामगारांसाठी “स्वच्छता सारथी शिष्यवृत्ती” सुरू केली – प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय.
 • टाकाऊ ते टिकाऊ अभियान हे _______ या संस्थेच्या नऊ राष्ट्रीय अभियानांपैकी एक आहे – पंतप्रधानांची विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश सल्लगार परिषद (PM-STIAC).
 • राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीचे विलीनीकरण केल्यानंतर दिलेले नवे नाव – संसद टीव्ही.
 • _____ या संस्थेने पदवीधर विद्यार्थ्यांची क्षमता आणि रोजगाराची कौशल्ये वाढविण्यासाठी जम्मू व काश्मिर रोजगार क्षमता संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम (JEET) नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE).
 • राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद (NCSM) आणि संस्कृती मंत्रालय यांनी विकसित केलेले 22 वे विज्ञान केंद्र – उदयपूर विज्ञान केंद्र, त्रिपुरा.
 • 01 मार्च 2021 पासून नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC-in-C), ईस्टर्न नेव्हल नौदल कमांड (ENC) – व्हाइस अॅडमिरल अजेंद्र बहादुर सिंग.
 • 22 फेब्रुवारी 2021 रोजी _____ याचा ‘भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934’ याच्या द्वितीय अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला, ज्यामुळे त्याला अनुसूचीत वाणिज्य बँक (शेड्यूल्ड बँक) बनविण्यात आले – फिनो पेमेंट्स बँक.
 • संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी – रवी कपूर.
 • “पौना दी सरगम” या पुस्तकाचे लेखक – जस प्रीत कौर.
 • ‘संयुक्त राष्ट्रसंघ आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार 2020’चे विजेता – सस्मिता लेन्का (ओडिशाची वन सेवा अधिकारी).
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – मातम वेंकट राव.

Leave a Comment