चालू घडामोडी | 03 जुलै 2020

जागतिक बँकेचे भारताला विक्रमी कर्ज :

जागतिक बँकेने गेल्या वर्षभरात सर्वाधिक कर्ज रक्कम भारताला उपलब्ध करून दिली असून तरतुदीपैकी निम्मी रक्कम करोना संकट तिमाहीत वितरित केली आहे.

सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्राबरोबर या आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्याचा अधिक लाभ देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला झाला आहे. जुलै २०१९ ते जून २०२० असे जागतिक बँकेचे वित्त वर्ष मंगळवारीच संपुष्टात आले.

या दरम्यान जागतिक बँकेने भारताला एकूण ५.१३ अब्ज डॉलरचा कर्जपुरवठा केला आहे. पैकी २.७५ अब्ज डॉलर रक्कम ही गेल्या तिमाहीतच वितरित करण्यात आली आहे.

रशियाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार :

सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 38 हजार 900 कोटी रुपये खर्चून 33 लढाऊ जेट विमाने, अनेक क्षेपणास्त्र यंत्रणा आणि इतर लष्करी साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.

रशियाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार. सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून 12 एसयू-30 एमकेआय (सुखोई) विमाने खरेदी केली जाणार आहेत. तर 248 ‘अ‍ॅस्ट्रा’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

वित्तीय संस्थाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर :

देशातल्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज वित्त कंपन्यांना त्याच्या रोकड सुलभतेसाठी सरकारने 30 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासाठी एक विशेष लिक्विडिटी योजना देखील जाहीर केली आहे. या योजनेचा गृह कर्ज देणाऱ्या कंपन्याना लाभ होणार.

  • या निधीला सरकारची हमी असणार आहे.
  • हा निधी भारतीय रिझर्व बँकेकडून दिला जाणार आहे.
  • SBI कॅपिटल मार्केट लिमिटेड या कंपनीने स्थापन केलेल्या SLS ट्रस्ट या SPV उपक्रमाने ही योजना तयार केली आहे.
  • बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज वित्त कंपन्या केवळ विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी या निधीचा उपयोग करू शकणार.
  • त्यांच्या मालमत्तेचा विस्तार करण्यासाठी करू शकणार नाही. RBIकडे नोंदणीकृत आणि NBFC अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म वित्त संस्था (MFI) देखील या सुविधेतून निधी उभारू शकणार.

भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे :

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे. नुकताच भारतीय रेल्वेनं 8.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं शेषनाग असं नाव दिलं आहे.

भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेनं रेषनाग या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडून तयार केली आहे.

या मालगाडीत एकूण 251 डबे जोडण्यात आले होतं. तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.

Leave a Comment