चालू घडामोडी | 29 जून 2020

संस्कृती मंत्रालयाचा ‘संकल्प पर्व’ वृक्षारोपण कार्यक्रम:

देशात स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी राहत्या नी कामाच्या ठिकाणी किंवा जिथे शक्य असेल त्या ठिकाणी किमान पाच झाडे लावावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या अनुषंगाने केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्रालयाने ‘संकल्प पर्व’ या नावाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

दिनांक 28 जून ते 12 जुलै 2020 या काळात हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, संस्कृती व पर्यटन मंत्रालयाची सर्व संलग्न कार्यालये, शिक्षण संस्था, संलग्न आणि संबंधित संस्था त्यांच्या संकुलात किंवा सभोवतालच्या परिसरात जिथे शक्य असेल तिथे वृक्षारोपण करणार आहे.

पंतप्रधानांनी जी झाडे सुचवली आहेत त्या पाच झाडांची आणि देशाच्या वनौषधी वारशांचे दर्शन घडवणाऱ्या झाडांची लागवड करण्यात यावी, अशी शिफारस संस्कृती मंत्रालयाने केली आहे. या झाडांमध्ये वड, आवळा, पिंपळ, अशोक आणि बेल या झाडांचा समावेश आहे. जर झाड़ांची रोपे उपलब्ध नसल्यास लोकांनी त्यांच्या आवडीच्या झाडांच्या रोपांची लागवड करावी असे देखील सांगण्यात आले आहे.

तसेच लावलेले रोपे जगावीत आणि त्यांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी देखील काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने या संकल्प पर्वात सहभागी व्हावे आणि किमान एका तरी रोपाची काळजी घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यातील NCRA च्या शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध :

पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या खोडद येथील जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाच्या अर्थात जीएमआरटीच्या मदतीने पुणे येथील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ अशा मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. ‘जे 16155452’ असं या आकाशगंगेच नाव आहे.

या आकाशगंगेच्या अवशेषांतून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ.झारा आर यांनी केले आहे.

ते नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘आर्काईव्ह’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगेचे अवशेष सापडणे तसे दुर्मिळ असते. पण, त्याचबरोबर तिचा अभ्यास करण्याचे आव्हानही असते.

भारतीय वंशाचे लिओ वराडकर आयर्लंडचे उपपंतप्रधान :

गेल्या फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आयर्लंडमध्ये तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले. त्यासाठी ठरलेल्या सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार आता मायकेल मार्टिन हे पंतप्रधान, तर मावळते पंतप्रधान लिओ अशोक वराडकर उपपंतप्रधान झाले.

अडीच वर्षांनी डिसेंबर २०२२ मध्ये मूळचे भारतीय वंशाचे असलेले ४१ वर्षांचे वराडकर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान होतील. फिने गेल या पक्षाचे नेते असलेले वराडकर सन २०१७ पासून ते फेब्रुवारीतील निवडणुकीपर्यंत पंतप्रधान होते. वराडकर यांचा जन्म आयर्लंडमध्येच झाला असला तरी त्यांचे वडील मूळचे कोकणातील मालवणचे आहेत.

वराडकर यांचा फिने गेल, मार्टिन यांचा फिआन्ना पेल व ग्रीन पार्टी या तीन पक्षांनी मिळून आताचे आघाडी सरकार स्थापन केले आहे. फिने गेल व फिआन्ना गेल हे परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष असून, आयर्लंडमधील यादवी युद्धानंतर हे दोन पक्ष सत्तेत प्रथमच एकत्र आले

Leave a Reply