DRDO कडून ‘डेअर टू ड्रीम 2.0’ ही नव उद्योजकांसाठीची स्पर्धा जाहीर :
27 जुलै 2020 रोजी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त, संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) संशोधन कार्यासंबंधी “डेअर टू ड्रीम 2.0” ही स्पर्धा जाहीर केली.
नव्याने उदयाला येत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणारे संशोधक आणि नवउद्योजक यांच्या संरक्षण आणि उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे.
हे देशातल्या संशोधक व नवउद्योजकांसाठी प्रोत्साहनपर खुले आव्हान आहे. तज्ञ समितीकडून योग्य परीक्षणानंतर विजेते निवडले जाणार. नवउद्योजकांना 10 लक्ष रुपयांपर्यंत तर व्यक्तिगत गटात पाच लक्ष रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.
रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला :
दक्षिण चीन समुद्रापासून ते पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणावाची स्थिती निर्माण करणाऱ्या चीनला रशियाने सर्वात मोठा झटका दिला आहे.
रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चीनला रशियाकडून ही मिसाइल प्रणाली मिळणार होती.
S-400 चा जगातील सर्वात घातक मिसाइल सिस्टिममध्ये समावेश होतो. फायटर विमानांपासून ते शत्रुचा मिसाइल हल्ला परतवून लावण्याची या सिस्टिममध्ये क्षमता आहे. कुठल्याही देशासाठी एक प्रकारचे हे हवाई सुरक्षा कवच आहे.
जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात :
जगात असलेल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सुमारे ३० हजार हत्ती आणि ५०० सिंहही आहेत.
बुधवारी साजऱ्या होणाºया जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जावडेकर यांनी भारतातील वाघांविषयीचा ‘आॅल अबाऊट टायगर एस्टिमेशन २०१८’ या नावाचा एक अहवाल जारी केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जावडेकर यांनी सांगितले की, १९७३ साली भारतात ९ व्याघ्र अभयारण्ये होती. त्यांची संख्या आता ५० झाली आहे.
जगाच्या एकूण जमिनीपैकी फक्त २.५ टक्के जमीन भारतात आहे. मात्र, आपली जैवविविधता ८ टक्के आहे. जगातील फक्त १३ देशांत आता वाघ सापडतात. वाघांच्या संवधर्नासाठी काम करणाºया लोकांना प्रशिक्षण देण्यास भारत तयार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे काही वर्षांपूर्वी वाघांचे वास्तव्य असलेल्या देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती.
या बैठकीत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय झाला होता. याच बैठकीत २९ जुलै हा ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कॉर्बेट अभयारण्यात सर्वाधिक वाघ
- अहवालातील माहितीनुसार, भारतातील वाघांपैकी सर्वाधिक २३१ वाघ कॉर्बेट अभयारण्यात आहेत.
- मात्र, मिझोरममधील डम्पा अभारण्य, प. बंगालमधील बक्सा अभयारण्य व झारखंडमधील पलामाऊ अभयारण्य या तीन अभयारण्यांत एकही वाघ उरलेला नाही.
- भारतात आढळणाºया एकूण वाघांपैकी ६५ टक्के म्हणजेच १,९२३ वाघ अभयारण्यात आहेत.
“BelYo”: भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ :
“BelYo” या नावाने भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) मान्यता दिलेल्या 730 शासकीय प्रयोगशाळा आणि 270 खासगी प्रयोगशाळांपर्यंत पोहोचणे आणि माहिती गोळा करणे हे हा मंच तयार करण्यामागचे उद्दीष्ट आहे.
ठळक बाबी
- हा मंच भौतिक स्वरूपात असलेली नागरिकांची कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि लसीकरण माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतो, जी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणाऱ्या आरोग्य सेतूसारख्या कोणत्याही अॅपमार्फत पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.
- एखादी व्यक्ती क्यूआर कोडच्या मदतीने स्वतःचे परीक्षण करू शकते आणि त्यासंबंधीची माहिती पुनर्प्राप्त करू शकते, ज्यामुळे प्रक्रिया 100 टक्के संपर्क-विरहित होते.
- हा मंच बेलफ्रिक्स बीटी ही कंपनी, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संगोपनाखाली असलेली योसिंक ही स्टार्टअप कंपनी यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.
- याच्या विकासासाठी एमफॅसिस एफ1 फाउंडेशन या संस्थेनी वित्तपूरवठा केला.