चालू घडामोडी | 29 ऑगस्ट 2020

शिंजो आबे : जपानच्या पंतप्रधानांनी तब्येतीमुळे दिला राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय.

आपल्या आजारपणामुळे निर्णय खोळंबू नयेत म्हणून हा निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करत नसल्याबद्दल जपानी जनतेची माफी मागितली आहे.

गेल्या वर्षी शिंजो आबे हे जपानचे सर्वांत जास्त काळ पदावर असणारे पंतप्रधान ठरले होते. त्यांचा सध्याचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2012मध्ये सुरू झालाय.

प्रधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण :

“प्रधान मंत्री जन-धन योजना (PMJDY) – वित्तीय समावेशनासाठीचे राष्ट्रीय अभियान” योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट 2014 पासून केली जात आहे. ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 40.35 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली.

त्यापैकी ग्रामीण भागात 63.6 टक्के खाती उघडली गेली. महिलांच्या PMJDY खात्यांचे प्रमाण 55.1 टक्के आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली.

नीलेश कुलकर्णी यांच्या संस्थेला खेळ प्रोत्साहन पुरस्कार :

भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवार, २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

खेळाडूंना योग्य कारकीर्दीच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचे आणि विकासाच्या दृष्टीने खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कुलकर्णी यांच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे (आयआयएसएम) करण्यात येते.

४७ वर्षीय कुलकर्णी यांनी ३ कसोटी आणि १० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

वन लाइनर चालू घडामोडी

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते “डायरेक्टरेट जनरल नॅशनल कॅडेट कॉर्प्स (DGNCC) मोबाइल ट्रेनिंग” अॅपचे अनावरण झाले. ते NCC कॅडेट विद्यार्थ्यांना देशव्यापी ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात मदत करणारे मोबाइल अॅप आहे.
  • 27 ऑगस्ट 2020 रोजी BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या उद्योग मंत्र्यांची 5 वी आभासी बैठक घेण्यात आली होती. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • 27 ऑगस्ट 2020 रोजी BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या उद्योग मंत्र्यांची 5 वी आभासी बैठक घेण्यात आली होती. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • अ‍ॅक्सिस बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली आहे. वयवर्ष 35 खालील व्यक्तींना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी हे खाते सोयीचे ठरणार आहे. यामार्फत वार्षिक 20 हजार रुपयांचा विमा देखील दिला जाणार आहे.

Leave a Reply