चालू घडामोडी | 28 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 26 सप्टेंबर 2020 रोजी भारताने डेन्मार्क देशासोबत बौद्धिक संपदा सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला.

2) जागतिक बँकेने (WB) देशातील ग्रामीण भागात सुरक्षित पाणी आणि स्वच्छता सेवांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी बांगलादेशला 200 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.

3) भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली. ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) यांच्या ‘JIMEX’ कवायती 2012 सालापासून आयोजित केली जात आहे.

4) अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह पे प्रणाली” सादर करणार आहे. “पॉजिटीव्ह पे प्रणाली” याच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.

5) 21 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 लक्ष गावांना ऑप्टिकल फायबरद्वारे 1000 दिवसात इंटरनेट सेवा पुरवण्यात येणार आहे.

कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी :

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित झालेल्या कृषीसंबंधित तीन विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज रविवारी स्वाक्षरी केली. यामुळे या विधेयकांचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

ही विधेयके पारित केल्यानंतर सर्व विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेत, त्यावर स्वाक्षरी करू नका, अशी आग्रहाची विनंती केली होती. सरकारने हे विधेयक घटनाबाह्य मार्गाने पारित केल्याची तक्रारही केली होती. यानंतर या विधेयकांच्या विरोधात देशभरात आंदोलनही करण्यात आले होते.

पारित झालेले तिन्ही विधेयक सरकारने अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले होते. आज त्यावर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी दिली.

आणखी तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा :

भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत – भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC), न्यू इंडिया अ‍श्युरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC).

“डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” ही अशी विमाप्रदाता संस्था मानली जाते जी अपयशी ठरणे म्हणजे ‘खूप मोठे नुकसान होणे’ असा अर्थ होतो. म्हणजेच त्या सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या असतात. संकटाच्या वेळी अश्या संस्थांना सरकारचे पाठबळ मिळावे या दृष्टीने ही योजना आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना :

अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे. “पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.

माहितीच्या असमानतेच्या परिस्थितीत निवारण उपाययोजना हाती घेतल्या जातात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापित करते.

Leave a Reply