चालू घडामोडी | 28 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) २८ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.

2) कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्याच्या प्रयत्नात बांगलादेश सरकारने देशात “नो मास्क नो सर्व्हिस” धोरण अंमलात आणले आहे. धोरणानुसार, मास्क नसलेल्या कोणालाही कार्यालयात तसेच सार्वजनिक स्थळी देखील प्रवेश दिला जाणार नाही.

3) दक्षिण कोरिया आधारित इलेक्ट्रॉनिक्स समूहातील, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने ‘फोर्ब्सद्वारे प्रकाशित’ वर्ल्डच्या सर्वोत्कृष्ट नियोक्ता 2020 च्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.

4) भारतीय वंशाचे वावेल रामकलावन यांची सेशेल्स देशाच्या राष्ट्रपती पदावर निवड झाली आहे. सेशेल्स हा हिंद महासागरातला एक पूर्व आफ्रिकी देश आहे आणि 115 बेटांचा एक द्वीपसमूह आहे.

5) उत्तरप्रदेश राज्याने राज्याने प्रधान मंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी योजनेची (स्वनिधी योजना) अंमलबजावणी करण्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. कर्जासाठी अर्ज, मंजूरी आणि वितरण या तीनही श्रेणींमध्ये राज्य अव्वल ठरले. पी. एम. स्वनिधी योजनेअंतर्गत कोविड-19 टाळेबंदीमध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशातल्या फेरीवाल्यांना 10 हजारांचा पतपुरवठा केला जात आहे.

6) ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त विद्यमाने AIM (अटल इनोव्हेशन मिशन) 7 आणि 8 डिसेंबर रोजी ‘इंडिया-ऑस्ट्रेलिया सर्क्युलर इकॉनमी हॅकाथॉन (I-ACE)’ आयोजित करणार आहे.

7) केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘ई-धरती जिओ पोर्टल’ लॉन्च केले आहे.

8) गुजराती चित्रपट सुपरस्टार आणि अभिनेता-राजकारणी-नरेश कनोडिया यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते.

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड :

परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील. तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी 355 जण इच्छुक होते.

सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत. तर दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत.

नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे.

‘अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम-1967’ अंतर्गत अठरा व्यक्ती दहशतवादी म्हणून घोषित :

सुधारित ‘अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम-1967’ यामधील तरतुदीनुसार, केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये चार आणि जुलै 2020 मध्ये नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2020 रोजी सरकारने आणखी अठरा व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्यांची नावे कायद्याच्या सूचीत समाविष्ट केली.

यादीत पाकिस्तानमधल्या “इंडियन मुजाहिद्दीन” या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सह-सदस्य असणाऱ्या मोहम्मद इकबाल आणि रियाझ इस्माईल शाहबंदरी यांचा समावेश आहे. ते जर्मन बेकरी (2010), चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू (2010), जामा मशिद (2010), शीतलाघाट (2010) आणि मुंबई (2011) सह भारतातल्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.

तसेच दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीच्या सर्व गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड कारवाया पाहणारा ‘छोटा शकील’ देखील यादीत आहे.

अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब :

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नियुक्ती झाली आहे. तत्पूर्वी रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते. तर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला एक आठवडा उरला असताना ही निवड झाली आहे.

यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान जास्त असून त्यात काही वाद झाले व ते प्रकरण न्यायालयात गेल्यास आपल्याला अनुकूलता राहावी यासाठी ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या मर्जीतील बॅरेट यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी लावल्याचा आरोप होत आहे.

सिनेटमध्ये बॅरेट यांच्या नावावर 52 विरुद्ध 48 मतांनी शिक्कामोर्तब झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची एकजूटही बॅरेट यांची नियुक्ती रोखू शकली नाही कारण रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत आहे.

2 thoughts on “चालू घडामोडी | 28 ऑक्टोबर 2020”

Leave a Comment