चालू घडामोडी | 28 जून 2020

वंदे भारत मिशन द्वारे ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी :

कोरोनामुळे जगाच्या विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना हवाई मार्ग आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत 725 विमानांद्वारे 1 लाख 45 हजार भारतीय मायदेशी परतले आहेत.

6 मे पासून या मिशनद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या कालावधीत 50 हजार पेक्षा अधिक नागरिक भारतातून जगाच्या विविध भागात गेले आहेत. शुक्रवारी विविध देशांतून 3816 भारतीय देशात परतले.

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर बंदी असली तरी देशांतर्गत हवाई प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी देशभरात एकूण 1536 विमानांची देशांतर्गत वाहतूक करण्यात आली त्याद्वारे 63  हजार 722  प्रवाशांनी हवाई प्रवास केला.

बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश-2020 :

बँकांच्या ठेवीदारांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी दिनांक 27 जून 2020 रोजी ‘बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश-2020’ प्रख्यापित केला.

हा अध्यादेश ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सहकारी बँकांना बळकट करण्यासोबतच सहकारी बँकांना इतर बँकांच्या बाबतीत आधीच उपलब्ध असलेले अधिकार प्रदान करून आणि व्यवसायिकता सुनिश्चित करून भांडवल उपलब्ध करून प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न या अध्यादेशाने होणार आहे.

  • सहकारी बँकांना लागू असलेल्या ‘बँकिंग नियमन कायदा-1949’ यामध्ये या अध्यादेशाने दुरुस्ती केली गेली आहे.
  • या सुधारणांचा राज्य सहकारी कायद्याच्या अंतर्गत सहकारी संस्थांच्या राज्य निबंधकांच्या विद्यमान अधिकारांवर परिणाम होत नाही.
  • प्राथमिक कृषी पत संस्था (PACS) किंवा सहकारी संस्था ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट आणि मुख्य व्यवसाय शेती विकासासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे हा आहे; तसेच ज्या “बँक” किंवा “बँकर” किंवा “बँकिंग” हा शब्द वापरत नाहीत आणि धनादेश वठवत नाही त्यांना या सुधारणा लागू नाही.
  • सार्वजनिक, ठेवीदार आणि बँकिंग व्यवस्थेचे हित जपण्यासाठी आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तसेच वित्तीय व्यवस्थेत व्यत्यय टाळण्यासाठी पुनर्र्चना योजना किंवा बँकिंग कंपनीचे विलिनीकरण करण्याची योजना तयार करण्याकरीता बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 45 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आली आहे.

NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ

अमेरिकेतील जगविख्यात स्पेस एजन्सी नासाने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल व्हिडिओत नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने तब्बल 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे.

या कालावधीत ऑब्जर्वेटरीने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे टिपली आहेत. त्यातूनच सूर्य ग्रहासंबंधातील काही महत्वाची माहितीही नासाने शेअर केली आहे. नासाने शेअर केलेल्या माहितीचा अभ्यास केल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

नासाच्या सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षे सूर्य ग्रहावर नजर ठेवली होती, त्यासोबतच त्याने सूर्याच्या 45 कोटी हाय-रेज्युलेशनचे छायाचित्रे घेतली आहेत. तसेच 2 कोटी गीगाबाईट डेटाही जमा केला आहे. नासाच्या एका स्टेटमेंटनुसार, टाईम लैप्स व्हिडिओ जारी करण्यात आला असून टाईम लैप्स फुटेजमध्ये सूर्याच्या 11 वर्षांपासून सुरु असलेल्या सौर चक्राच्या गतीमधील वाढ आणि घट दाखविण्यात आली आहे.

या गतीमानतेमुळे शास्त्रज्ञांना आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यांच्या कामकाजाबद्दलची अधिक प्रभावीपणे माहिती घेता येईल. तसेच, सौर मंडलास कशाप्रकारे प्रभावित करतात याचीही माहिती मिळाली आहे. नासाच्या संशोधनानुसार, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र एका चक्रातून जाते, त्यास सौर चक्र असे म्हणतात. दर ११ वर्षांनी सूर्याचे चुंबकीय क्षेत्र पूर्णपणे बदलले जाते.

1 thought on “चालू घडामोडी | 28 जून 2020”

Leave a Comment