चालू घडामोडी | 28 ऑगस्ट 2020

0

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र :

भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – त्रिची (तामिळनाडू), रायगंज (पश्चिम बंगाल), राजकोट (गुजरात), जबलपूर (मध्यप्रदेश), झांसी, मेरठ (उत्तरप्रदेश), हम्पी शहर (कर्नाटक).

‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर :

नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत – धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक अनुक्रमे गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांनी पटकवले आहेत. केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक अनुक्रमे दिल्ली, गोवा आणि चंदीगड यांनी पटकवले आहेत.

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या (PMMY) महिला लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत तामिळनाडू प्रथम क्रमांकावर :

वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान मुद्रा योजनेच्या (PMMY) महिला लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे. 31 मार्च 2020 पर्यंत तामिळनाडूमध्ये 58,227 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले गेले.

पश्चिम बंगाल आणि कर्नाटकला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे. योजनेच्या अंतर्गत 15 कोटीहून अधिक कर्ज दिले गेले आहेत, ज्याची एकूण रक्कम 4.78 लक्ष कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here