चालू घडामोडी | 27 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 1980 पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली.

2) सामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एक आभासी महाशिखर परिषद आयोजित केली जाणार आहे, जिचे नाव आहे – “RAISE 2020” (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

3) प्रसिद्ध मल्याळी कवि अक्किथम अच्युतन नंबुथिरी यांचा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.

4) फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल विमान उडविणाऱ्या भारतातल्या प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरीत आहेत. ‘राफेल’ची जबाबदारी भारतीय हवाई दलाच्या ’17 गोल्डन अॅरो स्क्वॉड्रन’कडे सोपवण्यात आली आहे.

5) भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या संयुक्त उद्यम (JV) ने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ने रजत सुद यांची तातडीने अंमलबजावणीसाठी नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे.

6) केरळ टूरिझमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ह्युमन बाय नेचर’ मोहिमेला पाटा ग्रँड अवॉर्ड्स 2020 मध्ये तीनपैकी एक पुरस्कार मिळाला.

राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार :

प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे  (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो.

यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत. डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत. अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे.

तसेच भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ. कु लकर्णी यांना जातो. भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर डॉ. सूर्येदू दत्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.  डॉ. दत्ता हे भूवैज्ञानिक असून, डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.  

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘JIMEX 20’: भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती :

भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली. ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे.

रिअर अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाकडून स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेले विनाशक ‘चेन्नई’ जहाज, ‘तरकश’ लढाऊ जहाज, ‘दीपक’ फ्लीट टँकर यांचा सहभाग आहे. जहाजांव्यतिरिक्त P8I हे सागरी गस्त विमान, एकात्मिक हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने कवायतीत सहभागी होणार आहेत.

सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) यांच्या ‘JIMEX’ कवायती 2012 सालापासून आयोजित केली जात आहे.

Leave a Reply