चालू घडामोडी | 27 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) संयुक्त राष्ट्र संघटनांच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त पोस्ट ऑफिस (DOP), दळणवळण मंत्रालयाने एक स्मारक टपाल तिकिट जारी केले.

2) होंडुरास या 50व्या देशाच्या मंजुरी नंतर, संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले की आता 90 दिवसांमध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ लागू केला जाणार. करार 7 जुलै 2017 रोजी स्वीकारला गेला होता आणि 22 जानेवारी 2021 रोजी लागू होणार.

3) अमेरिकेनी तैवान ला तीन शस्त्रे प्रणालींची तसेच क्षेपणास्त्रे आणि तोफांची विक्री करण्यास मान्यता दिली आहे. एकूण 1.8 अब्ज डॉलर किंमतीच्या करारामार्फत तैवानला लॉकहीड मार्टिन कंपनीचे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम, 135 AGM-84H SLAM-ER क्षेपणास्त्र दिले जाणार.

4) संरक्षण मंत्रालयाने खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी नवीन नियम तयार केले आहेत. नवीन नियमांतर्गत, सैन्य दलांना त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जमिनीच्या बरोबरीची पायाभूत सुविधा मिळणार. जमीन सार्वजनिक उपयोगितांसाठी वापरली जाणार त्यामुळे संरक्षण दलांचा खर्च कमी करण्यात मदत होणार.

5) भारतीय नौदलाने कोची येथे सदर्न नेव्हल कमांड (SNC) द्वारे तीन महिला पायलटची डॉर्नियर विमानावरील पहिली तुकडी कार्यान्वित केली आहे.

6) कुपोषणाविरुद्ध लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासनाने मिड-डे मील कार्यक्रमा अंतर्गत संरक्षित शाळांमध्ये भात पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

7) दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या समूह सॅमसंग ग्रुपचे अध्यक्ष ली कुन-हे यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते.

8) ज्येष्ठ गुजराती चित्रपट संगीतकार, गायक आणि पाटण मतदारसंघातील माजी लोकसभेचे खासदार महेश कनोडिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा :

चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट काही वेळापूर्वीच करण्यात आलं आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही २०२४ पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे.

जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.

द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे दोन मंत्री भारतात :

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर यांचे ‘दोन अधिक दोन’ संवादासाठी दिल्लीत आगमन झाले. दोन अधिक दोन संवादाची ही तिसरी वेळ असून इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य तसेच संरक्षण व सुरक्षा या दोन क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधात सुधारणा हे या संवादाचे दोन मुख्य उद्देश असणार आहेत.

मंगळवारी पॉम्पिओ व एस्पर हे त्यांचे समपदस्थ परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत. प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर सहकार्य हा त्यांच्या भेटीचा एक हेतू आहे.

२०१८ मध्ये ‘कम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅग्रीमेंट’ (सीओएमसीएएसए) करार दोन्ही देशात झाला होता. २०२० मध्ये भारताला २० अब्ज डॉलर्सचे संरक्षण साहित्य विक्री करण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. दोन अधिक दोन संवाद प्रथम सप्टेंबर २०१८ मध्ये दिल्लीत झाला होता.

दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी कायदा :

दिल्लीतील प्रदूषणाची समस्यासाठी सर्वंकष कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल चार दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल. कायद्याद्वारे कायमस्वरूपी संस्थात्मक निर्मिती केली जाईल.

दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० हून अधिक नोंदवला गेला असून दसऱ्यानिमित्त होणाऱ्या रावणदहनामुळेही प्रदूषणात वाढ झाली आहे. हिवाळ्यात प्रामुख्याने पंजाब व हरियाणामध्ये शेतातील खुंटे जाळणीच्या प्रकारांमुळे दिल्लीतील प्रदूषणात वाढ होते.

या समस्येचा अभ्यास करण्यासाठी गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश मदन लोकूर यांची समिती नेमली होती. मात्र, या संदर्भात केंद्र कायदा करणार असल्याने लोकूर समिती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या तीन सदस्यीय पुढे सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केंद्राच्या निर्णयाची माहिती दिली. प्रदूषणामुळे लोकांचा श्वास घुसमटत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करावीच लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Leave a Comment