चालू घडामोडी | 27 ऑगस्ट 2020

आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना :

आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.

पोलिओ (शास्त्रीय नाव: पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणून ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो. पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.

स्पुटनिक 5 लशीच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा प्रस्ताव :

रशियाने कोविड 19 विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेल्या ‘स्पुटनिक 5’ या लशीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी रशियाने भारत सरकारकडे भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यासाठी भारताने मदत करावी अशीही रशियाची अपेक्षा आहे.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची बैठक 22 ऑगस्टला झाली त्यात या विषयावर चर्चा झाली आहे. स्पुटनिक 5 लस रशियाच्या गमालेया संशोधन संस्थेने तयार केली असून त्यासाठी रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचा वापर करण्यात आला आहे.

भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) यांच्यामध्ये एक करार :

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे विभागाच्या रेल्वेप्रणालीची नेटवर्क क्षमता, सेवा गुणवत्ता आणि सुरक्षा अश्या घटकांच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) यांच्यामध्ये एक करार झाला आहे.

करारानुसार, AIIB ‘मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-3’ यासाठी 500 दशलक्ष डॉलर (सुमारे 37.1004 अब्ज रुपये) एवढ्या रकमेचे कर्ज पुरविणार आहे. प्रकल्पासाठी अंदाजे 997 दशलक्ष डॉलर (जवळपास 73.97 अब्ज रुपये) खर्च येण्याचे अपेक्षित आहे.

वन लाइनर चालू घडामोडी

  • 25 ऑगस्ट 2020 रोजी भारत आणि उझबेकिस्तान या देशांच्या संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक घेतली गेली होती. या बैठकीत संयुक्तपणे चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. 
  • बांगलादेशाचे सरकार देशात शरण घेतलेल्या सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना मानववस्ती नसलेल्या ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना तयार करीत आहे.
  • 2019 सालाचे ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ विजेते – अनिता देवी कुंडू (भूमि), कर्नल. सरफराज सिंग (भूमि), टाका तामूत (भूमि), नरेंद्र सिंग (भूमि), केवल हिरेन कक्का (भूमि), सत्येंद्र सिंग (जल), गजानंद यादव (हवाई), कै. श्री मगन बिस्सा (जीवनगौरव)
  • नागरी अणुऊर्जा, अंतराळ, सागरी विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी शोध घेऊन हिंद-प्रशांत भागीदारीला बळकटी देण्यासाठी व्हिएतनाम देशाने भारताला समर्थन दिले आहे.
  • जर्मनीच्या बायर्न म्यूनिच या फुटबॉल संघाने ‘युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा जिंकली.

Leave a Reply