चालू घडामोडी | 26 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारतात जगातला सर्वात दीर्घ आणि सर्वोच्च उंचीवर बांधला जाणारा ‘शिंकुन ला बोगदा’ (13.5 कि.मी. लांबी) तयार करण्याची योजना आखली जात आहे. रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (NHIDCL) यांनी बोगद्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल कामाला गती दिली आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर मनाली (हिमाचल प्रदेश) – कारगील महामार्ग (लडाख) मार्ग संपूर्ण वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहणार.

2) 2020 मधील टाईम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे – पंतप्रधान मोदी, आयुष्मान खुराना, बिलकीस, सुंदर पिचाई, & रवींद्र गुप्ता.

3) हवामानातल्या बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी देशाच्या असलेल्या सज्जतेच्या संदर्भात अहवाल देणाऱ्या ‘वर्ल्ड रिस्क इंडेक्स 2020’ (WRI 2020) याच्या 181 देशांच्या यादीत भारत 89 व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नंतर चौथ्या क्रमांकावर आहे.

4) रसायन व खते मंत्रालयाने ‘प्लास्टिक उद्योग पार्क’ योजना सादर केली. योजनेनुसार, देशात 10 प्लास्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. ते उत्तराखंड, मध्यप्रदेश, आसाम, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उभारण्यात येणार.

5) MSME आणि स्टार्टअप उद्योग यासाठी वैयक्तिक नसलेल्या माहितीसंबंधी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. धोरणानुसार, एखाद्या व्यक्तीच्या संबंधीत वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य नसलेली कोणतीही माहिती वैयक्तिक नसलेली माहिती म्हणून ओळखली जाते.

6) ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रख्यात समालोचक डीन जोन्स यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते.

7) ज्येष्ठ अणु वैज्ञानिक आणि अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे कॉविड -19 मुळे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

8) भारतीय रिझर्व्ह बँकेनी शहरी सहकार बँकांसाठी ‘टेक्नॉलजी व्हिजन फॉर सायबर सिक्युरिटी – 2020-2023’ या शीर्षकाचे दस्तऐवज जाहीर केले आहे. ते ‘GUARD’ नामक पाच स्तंभावर केंद्रित आहे, जे पुढीलप्रमाणे आहेत – प्रशासन पर्यवेक्षण, उपयोगिता तंत्रज्ञान गुंतवणूक, योग्य नियमन व पर्यवेक्षण, मजबूत सहयोग व आवश्यक माहिती तंत्रज्ञान विकसित करणे आणि सायबरसुरक्षा कौशल्य संच.

9) राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प याच्या अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) या संस्थेच्यावतीने ‘कृत्यज्ञ’ हॅकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात संभाव्य तंत्रज्ञानयुक्त उपाययोजना विकसित करण्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम नियोजित केला गेला आहे.

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून मुंबईतील पालिका आयुक्त चहल यांचा गौरव :

मुंबईतील करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून ‘आयएसीसी कोविड क्रुसेडर्स २०२०’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दृक्श्राव्य माध्यमातून झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात चहल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दुतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला.

भारतात तसेच अमेरिकेत कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेल्या विविध व्यक्ती, संस्था यांना गौरवण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून इकबाल सिंह चहल हे विजेते ठरले आहेत. या संवर्गासाठी ४१ जणांची नावे नामांकन म्हणून निश्चित करण्यात आली होती.

Leave a Reply