चालू घडामोडी | 26 फेब्रुवारी 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 26th February 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • 24 फेब्रुवारी 2021 पासून नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग फ्लीट (FOCWF) – रिअर ऍडमिरल अजय कोचर.
 • भारत आणि बांगलादेश दरम्यानची नवी प्रवासी रेल्वे सेवा, जी 26 मार्च 2021 पासून सुरू होईल – हल्दीबाडी (भारत) – चिलहाटी (बांगलादेश) ट्रेन.
 • ग्रामस्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक जैविक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी, गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांचा नवीन प्रकल्प – “गोवन’ (GoVan)”.
 • दोन संस्थांमधील माहितीच्या विनिमयासाठी _____ आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (CBIC) यांचात सामंजस्य करार झाला – कॉर्पोरेट कार्य मंत्रालय.
 • ‘जायफळ फलावरण टॉफी उत्पादन प्रक्रिया’ मधील CCARI संस्थेच्या  तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी, ICAR-केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था, गोवा (ICAR-CCARI) आणि ____ यांच्यात सामंजस्य करार झाला – गोवा राज्य जैवविविधता मंडळ.
 • या राज्य मंत्रिमंडळाने ‘आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) नेस्तम’ या योजनेची अंमलबजावणी 2021-22 या आर्थिक वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंतर्गत 45 ते 60 वर्षे वयोगटातील प्रत्येक महिला लाभार्थ्याला तीन वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 15 हजार रुपयांच्या दराने 45,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल – आंध्रप्रदेश.
 • ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013’च्या लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत _____ सरकारने ‘मुख्यमंत्री घर घर रेशन योजना’ सुरू केली – दिल्ली सरकार.
 • 24 फेब्रुवारी 2021 रोजी, कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) आणि ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DCI) आणि ______ (जगातील सर्वात मोठा ड्रेजर उत्पादक) यांच्यात सामंजस्य करार झाला, ज्यामार्फत भारतात जागतिक दर्जाचे ड्रेजर बनवले जाणार – रॉयल IHC हॉलंड बी.व्ही. (नेदरलँड).
 • शिक्षण मंत्रालय आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्यावतीने 25 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी 16 व्या FICCI उच्च शिक्षण शिखर परिषदेची संकल्पना – “उच्च शिक्षण @ 2030: R.I.S.E. – लवचिकता, नाविन्यपूर्ण संशोधन, शाश्वत उद्यम”.
 • नव्या ‘माहिती तंत्रज्ञान (मंच मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया आचारसंहिता) नियमावली 2021’ याच्यानुसार, सामाजिक माध्यमे मंचांना ______ यांची नियुक्ती करावी लागणार – एक मुख्य अनुपालन अधिकारी, एक नोडल संपर्क अधिकारी, एक निवासी तक्रार निवारण अधिकारी.
 • IBM कंपनीच्या अहवालानुसार, 2020 साली आशिया-प्रशांत क्षेत्रात _____ नंतर भारत सर्वाधिक सायबर हल्ले झालेला दुसर्‍या क्रमांकाचा देश ठरला होता – जपान.

Leave a Comment