चालू घडामोडी | 26 ऑगस्ट 2020

‘राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद’ची स्थापना :

भारत सरकारने ‘राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद’ (National Council for Transgender Persons) याची स्थापना 21 ऑगस्ट 2020 रोजी केली आणि त्यासाठी एक अध्यादेश लागू करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्री परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार.

केंद्रीय सामाजिक न्याय व सबळीकरण राज्यमंत्री परिषदेचे पदसिद्ध उपाध्यक्ष असणार. तृतीयपंथीयांसाठी धोरण, कार्यक्रम, कायदे आणि प्रकल्प तयार करण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे; तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे निवारण करणे; ही परिषदेची कार्ये आहेत.

इंग्लंडचा जिम्मी अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पहिला वेगवान गोलंदाज :

इंग्लंडचा जिम्मी अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अझहर अलीला बाद करीत हा पराक्रम केला.

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या स्लिपमध्ये त्याचा झेल टिपल्यानंतर सर्व खेळाडू अँडरसनभोवती गोळा झाले. त्यानंतर अँडरसनने उजव्या हातात चेंडू पकडत मैदानाच्या चहूबाजूला नमस्कार केला. कोरोना व्हायरस महामारीमुळे मैदानात एकही प्रेक्षक नव्हता.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेप्रणालीची गुणवत्ता सुधारण्यासाठी अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेसोबत करार :

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे विभागाच्या रेल्वेप्रणालीची नेटवर्क क्षमता, सेवा गुणवत्ता आणि सुरक्षा अश्या घटकांच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) यांच्यामध्ये एक करार झाला आहे.

करारानुसार, AIIB ‘मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-3’ यासाठी 500 दशलक्ष डॉलर (सुमारे 37.1004 अब्ज रुपये) एवढ्या रकमेचे कर्ज पुरविणार आहे.

वन लाइनर चालू घडामोडी

  • नीलकांत भानुप्रकाश (२०) याने सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटरचा किताब जिंकला. लंडनमधील मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भानुने ३० स्पर्धकांना हरवले. त्याने शकुंतला देवी आणि स्कॉट फ्लॅन्सबर्गचा विक्रमही मोडीत काढला.
  • कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी जाहीर केले की राज्यात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ (NEP) लागू केले जाणार असून असे करणारे ते पहिले राज्य असणार आहे.
  • चीनच्या चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलजी कॉर्पोरेशन (CASC) या अंतराळ संस्थेनी “गाओफेन-9” या भू-निरीक्षण उपग्रह मालिकेचा ‘गाओफेन-9 05’ नावाचा पाचवा ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित केला. सोबतच ‘तियानतुओ-5’ नामक छोटा उपग्रह देखील पाठविला गेला.
  • आसाम राज्यात ब्रम्हपुत्र नदीच्या पात्राला पार करणाऱ्या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ती सेवा गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी या दोन भागांना जोडते. तो 1.8 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
  • रशियामध्ये सप्टेंबर महिन्यात “कावकाझ 2020” (किंवा कौकसुस 2020) नामक एक लष्करी सराव आयोजित करण्यात येणार आहे. या सरावामध्ये भारत, पाकिस्तान आणि चीन हे देश देखील भाग घेणार आहेत. सरावात तीनही संरक्षण दलांच्या सैनिकांचा समावेश केला जाणार आहे.

Leave a Comment